नाशिकरोड : वीज कंपनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तांत्रिक कामगार युनियनतर्फे वीज भवन येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज कंपनीमधील कामगारांना निवृत्ती वेतन योजना सुरू करावी, रोजंदारी काम केलेल्या कामगारांना तिसऱ्या उच्च पदाचा लाभ मिळावा, वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण देण्यात यावे आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी केंद्रीय उपसरचिटणीस आर. जी. देवरे, विभागीय अध्यक्ष नंदू नागपुरे, प्रदीप डांगळे, प्रवीण पाटील, पारखे, संदानशिव आदिंसह वीज कर्मचारी उपस्थित होते.
वीज कामगारांची निदर्शने
By admin | Updated: December 2, 2015 22:26 IST