शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

इगतपुरीच्या पूर्व भागात चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:53 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीत गेल्या आठवडाभरापासून जोरदार चालू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी विजेचे खांब पडले असून इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे.

ठळक मुद्देऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित ; विजे अभावी विस्कळीत जनजीवन अंधारात

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरीत गेल्या आठवडाभरापासून जोरदार चालू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी विजेचे खांब पडले असून इगतपुरीच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे.दरम्यान चार दिवसांपासून पूर्व भागातील टाकेद, खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणी, अडसरे, मायदरा-धानोशी, सोनोशी, बारशिगवे, वासाळी, इंदोरे, खडकेड, अधरवड, टाकेद खुर्द, अडसरे खुर्द आदी ग्रामपंचायतीसह जवळपास चाळीस वाड्या-वस्त्या ह्या गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहेत.वीजे अभावी ग्रामपंचायत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा बंद असल्याने अनेक कुटुंबांना अन‌् पावसाळ्यात पिण्याचे मिळत नाही, तसेच सध्या शालेय प्रवेश प्रक्रिया चालू आहेत, शालेय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी,कार्यालय, सेतू कार्यालय, आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालयात विविध कामकाजासाठी दाखले कागदपत्रे यांची गरज आहे. परंतु लाईट अभावी कोणतेच काम होत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्ग त्रस्त झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या सीइटी परीक्षा, ऑनलाइन शिक्षण,ऑनलाइन परीक्षा सध्या चालू असून लाईट नसल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.चार दिवसांपासून वीज नसल्याने घर घंटी, आटा चक्की, पीठ गिरणी बंद आहे, यामुळे घरगुती दळण दळण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. डीबरीसाठी घासलेट, रॉकेल मिळत नसल्याने अनेक कुटुंब गोडेतेलाचा पणतीचा वापर करत आहेत.अनेकांचे मोबाईल बॅटरी, इन्व्हर्टर संपल्याने पूर्व भागात संपर्क होत नाही गेल्या चार दिवसांपासून पूर्व भागात वीज पुरवठा बंद असल्याने सर्वत्र नागरिक भर पावसाळ्यात अंधारात आपले जीवन जगत आहे. अनेकदा स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, पोलीस पाटील वीज वितरणाच्या कर्मचारी वायरमनला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कोणीही कर्मचारी संपर्कात येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.दरम्यान चार दिवसांपासून लाईट नसल्याने इलेक्ट्रॉनिक सुख सुविधांपासून सर्व परिसर वंचित आहे. कागदपत्रे ऑनलाइन कामकाजसाठी विद्यार्थी ,शेतकरी बांधव पीक विमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित आहे तरी चार दिवसांपासून खंडित असलेला वीज पुरवठा तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्ती करून वीज पुरवठा नियमितपणे सुरळीत चालू करण्यात यावा अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.पूर्व भागातील टाकेद-खेड परिसरात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा भरण्यासाठी २३ तारीख शेवटची असल्याने चार दिवस विजेअभावी व्यर्थ गेले आहेत तरी संबंधित वीज वितरण विभागाने लक्ष्य घालून लवकरात लवकर वीज पुरवठा चालू करण्यात यावा."- दिलीप बांबळे, सीएससी केंद्रचालक टाकेद बु.

सध्या ऑनलाइन परीक्षा चालू आहे.अनेक विद्यार्थ्यांचे मोबाईलच चार्ज नसल्यामुळे बंद आहे यामुळे ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून हे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान आहे.- पूजा पाबळकर, विद्यार्थिनी.

खेड परिसर गेल्या चार दिवसांपासून अंधारात असल्यामुळे लाईट अभावी घरघंटी, आटा चक्की, पीठ गिरणी बंद असल्यामुळे घरगुती दळण दळण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा,महाविद्यालय, ग्रामपंचायत कार्यालये, बँक यासोबतच तलाठी कार्यालय सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज लाईटवर अवलंबून आहे. संबंधित विभागाने तात्काळ वीज पुरवठा चालू करावा अशी मागणी होत आहे.- सागर वाजे, ग्रामस्थ खेड, परदेशवाडी.

टॅग्स :talukaतालुकाelectricityवीज