शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुणवंत पिढी समाजाचे बलस्थान

By admin | Updated: August 23, 2015 23:17 IST

विजय बिरारी : विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे गुणगौर

वनाशिक : कुटुंब शिकले, तर समाज मोठा होत असतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील गुणवंत पिढी ही समाजाचे बलस्थान असून, अशा गुणीजनांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले. कापड बाजारातील शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विजय बिरारी होते. यावेळी बिरारी यांनी समाजाच्या संघटनावर भर देत समाजाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समस्त शिंपी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनीही समाज संघटित करण्यासाठी विविध उपक्रमांची माहिती देत यापुढे एकत्रितरीत्या संत नामदेव महाराजांची जयंती साजरी करण्याचा संकल्प सोडला. समाजातील ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी विनामूल्य घेण्यात येणार असल्याचेही नेवासकर यांनी जाहीर केले. समाजाचे उपाध्यक्ष रवींद्र बागुल यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पहिली ते पदव्युत्तर शिक्षणात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जेईई अ‍ॅडव्हॉन्स परीक्षेत धवल कामगिरी करणाऱ्या निखिल गवादे यासही गौरविण्यात आले. सिडकोतील अंध व्यावसायिक प्रशांत सोनवणे यांना सिडकोतील समाजाने व्यवसायासाठी टपरी उपलब्ध करून दिल्यानंतर ट्रस्टनेही त्यांना एक हजार रुपयांची मदत जाहीर केली. सूत्रसंचालन हेमंत सोनवणी व सुनील बाबूराव जगताप यांनी केले. व्यासपीठावर नारायण जगताप, अमर सोनवणे, ट्रस्टचे अध्यक्ष संदीप खैरनार, नाशिकरोडचे अध्यक्ष संजय खैरनार, हितवर्धक मंडळाचे सचिन बोरसे, सुनील काशीनाथ जगताप, किशोर जगताप, नंदलाल जगताप, राजेश जगताप, धारणकर, श्रीनिवास निकुंभ, शोभा बोरसे, पल्लवी कापडणे, सुनंदा बाविस्कर आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)