शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वीज घालविल्यास निर्मिती केेंद्रांना फटका? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:23 IST

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करून पणती, टॉर्च, मोबाइलची लाइट सुरू ठेवले तर या नऊ मिनिटांच्या काळात व त्यानंतरही विजेची मागणी एकदम कमी होऊन वीजनिर्मिती केंद्रांना मोठा फटका बसू शकतो.

ठळक मुद्देआर्थिक नुकसानीची भीती : भारनियमनाचा पर्यायविजेची मागणी व उत्पादन बरोबरीने करून समतोल साधावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करण्याचे आवाहन केले असले तरी, तांत्रिकदृष्ट्या वीजनिर्मिती केंद्रांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अचानक दिवे घालविणे व पुन्हा चालू करणे या दोन्ही बाबींमुळे होऊ घातलेले संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जनतेला रविवारी दिवसभर अधून-मधून भारनियमनाला सामोरे जाण्याची शक्यताही जाणकारांनी बोलून दाखविली आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करून पणती, टॉर्च, मोबाइलची लाइट सुरू ठेवले तर या नऊ मिनिटांच्या काळात व त्यानंतरही विजेची मागणी एकदम कमी होऊन वीजनिर्मिती केंद्रांना मोठा फटका बसू शकतो. अशा वेळी जलविद्युत केंद्रे महत्त्वाचा आधार ठरू शकतात. कारण यदा कदाचित ग्रिड फेल्युअरमुळे संच ट्रीप झाले तरी औष्णिकपेक्षा जलविद्युत केंद्रे लवकर कार्यान्वित करता येते असे जाणकारांचे म्हणणे असून, ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढली किंवा एकदम कमी झाली तरीही ग्रीडसाठी धोकादायक असते. विजेची मागणी व उत्पादन बरोबरीने करून समतोल साधावा लागतो. वन नेशन, वन ग्रीड अँड वन फ्रिक्वेन्सी असे धोरण देशभरात असल्याने वीजनिर्मिती केंद्रे त्याप्रमाणात कमी, अधिक लोडवर सुरू ठेवावे लागतात. अचानक वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे ग्रीड फेल्युअर होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वीजेची मागणी व पुरवठा यातील फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली की वीजनिर्मिती केंद्रातील सुरू असलेले संच आपोआप ट्रिप होतात. ते पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या राज्यात महानिर्मितीचे नाशिक, खापरखेडा, परळी व भुसावळ ही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे विजेची मागणी कमी झाल्याने आधीच बंद आहेत. कोराडीचे ६६० मेगावॉटचे तीन, पारसचे २५० मेगावॉटचे दोन व चंद्रपूरचे ५०० मेगावॉटचे दोन असे महानिर्मितीचे सात संच सुरू आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे विजेची फ्रिक्वेन्सी बदलली तर या सुरू असलेल्या केंद्रांवरही परिणाम होऊन ट्रिप होण्याची भीती जाणकार व्यक्त करीत असून, महाराष्ट्रातील कमाल विजेची मागणी १७ हजार मेगावॉटवर आली आहे. रविवारी रात्री सर्वत्र वीज बंद राहिली तर अचानक मागणी घटून फ्रिक्वेन्सी वाढली तर काय? अशी शंका अभियंत्यांना आहे. त्यासाठी आधीपासूनच संच बंद ठेवून काही भागात भारनियमन करावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यामुळे वीज क्षेत्रातील अधिकारी, अभियंते, कामगार यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक