शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

औद्योगिक वसाहतीवर ‘परिवर्तन’ची सत्ता

By admin | Updated: August 9, 2015 22:24 IST

स्टाईस निवडणूक : परिवर्तनला दहा, तर प्रगती पॅनलला दोन जागा

मुसळगाव : सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी व्यवस्थापक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने १२ पैकी १० जागा जिंकून संस्थेत परिवर्तन घडविले. विद्यमान अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी प्रगती पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या. संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले. ३५९ मतदारांपैकी ३३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यात परिवर्तन पॅनलला दहा तर प्रगती पॅनलला दोन जागा मिळाल्या.कारखानदार गटात परिवर्तन पॅनलचे संदीप नामकर्ण आवारे (१८५), प्रभाकर दिगंबर बडगुजर (१७५), अरुण किसनराव चव्हाणके (१८४), किशोर सुरेश देशमुख (१६६) व अविनाश एकनाथ तांबे (१७८) हे विजयी झाले, तर प्रगती पॅनलचे नेते दिलीप रामराव शिंदे (१६७) व सुनील दादाजी कुंदे (१६७) या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. परिवर्तन पॅनलच्या विठ्ठल माधव जपे (१५९), दिलीप दलीचंद कुचेरिया (१४१) या दोघा उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. प्रगती पॅनलचे अरुण केरूजी डावखर (१०९), भगतसिंग सिंगारासिंग राजपूत (१३२), विजय भाऊराव सपकाळ (११८), संजय संपतराव शिंदे (१३४), अजय कचरदास बेदमुथा (१४३) यांच्यासह अपक्ष उमेदवार प्रवीण वसंत गद्रे (६०) यांचा पराभव झाला. महिला राखीव गटाच्या दोन जागांवर परिवर्तन पॅनलच्या मीनाक्षी बाबासाहेब दळवी (१९७) व पद्मा जगदीश सारडा (१८३) विजयी झाल्या. त्यांनी प्रगती पॅनलच्या रेखा सुनील जोंधळे (१३९), विजया बंडू पगार (१२७) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या चिंतामण पुंजाजी पगारे (१७५) यांनी प्रगती पॅनलच्या सुधीर गंगाधर वाकचौरे (१५८) यांना नमविले. विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या रामदास भास्कर दराडे (१८८) यांनी प्रगती पॅनलच्या नारायण वामन पाटील (१४२) यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गाच्या राखीव मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या पंडितराव विठ्ठल लोंढे (१८५) यांनी विजय मिळवला, तर प्रगती पॅनलचे प्रशांत रामचंद्र नाईक (१४८) पराभूत झाले. निवडणूक निकालानंतर परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवार व समर्थकानी एकच जल्लोष केला. (वार्ताहर)