शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वीजप्रश्नी आक्रमक : राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:14 IST

नांदगावी शेतकºयांचा रास्ता रोको नांदगाव : वीजप्रश्नी तालुक्यातील पिंप्राळे वाखारी येथील शेतकºयांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदगाव - मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून थातूरमातूर उत्तर देत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेले. या पार्श्वभूमीवर वेळ झाल्याने व रहदारी जाम झाल्याने तोंडी आश्वासनावर आंदोलकांनी रस्ता सोडला.

ठळक मुद्देनांदगावी शेतकºयांचा रास्ता रोकोवीजप्रश्नी आक्रमक : राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

नांदगावी शेतकºयांचा रास्ता रोको

नांदगाव : वीजप्रश्नी तालुक्यातील पिंप्राळे वाखारी येथील शेतकºयांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदगाव - मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून थातूरमातूर उत्तर देत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेले. या पार्श्वभूमीवर वेळ झाल्याने व रहदारी जाम झाल्याने तोंडी आश्वासनावर आंदोलकांनी रस्ता सोडला.माजी नगरसेवक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे यांनी भेट दिली. अर्धवट योजना बनवून शेतकºयांची सत्त्वपरीक्षा पाहणारी वस्तुस्थिती येथील रास्ता रोको आंदोलनात समोर आल्याने वीज वितरण विभागाचे पितळ उघडे पडले. थकबाकीचे कारण पुढे करून वीज पुरविण्याचे नाकारणाºया विभागाला एकही रुपया थकबाकी नसली तरी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करू शकणार नाही याची कबुली द्यावी लागली. रब्बी हंगाम सुरू झाला असून, कांदा, गहू व इतर पिकांची लागवड सुरू आहे. विहिरींना पाणी आहे. मात्र २४ तासांत एक ते दोन तासच तो ही कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरीवर्गापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे संतप्त पिंप्राळे, वाखारी, हिंगणवाडी व इतर गावांच्या शेतकºयांनी रास्ता रोको केला. रजेवर गेलेल्या साळुंके यांच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त भार अशोक येवला यांच्याकडे असल्याने ते व सहाय्यक अभियंता गायत्री चव्हाण यांना आंदोलकांच्या रोषास सामोरे जावे लागले. शिवाजी पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष प्रदीप कासलीवाल यांनी दररोज किमान आठ तास अखंडित वीजपुरवठ्याची मागणी केली.वीज वितरण विभागाकडून बाजू मांडताना येवला व चव्हाण यांनी संजीवनी कृषी योजनेतील बिलाची रक्कम न भरणाºया शेतकरी ग्राहकाचा पुरवठा बंदच ठेवू तसेच बिले भरल्यानंतरही अखंडित वीजपुरवठ्याचे ठोस आश्वासन देऊ शकत नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.यावेळी शेतकºयांना बिल भरण्यासाठी काही दिवसांची मुदत द्या. त्यानंतर ज्यांच्याकडे बाकी असेल ते वगळून इतराना सलग आठ तास वीजपुरवठा द्या, अशी मागणी पाटील व कासलीवाल यांनी केली. अधिकाºयांना फटकारलेशेतकºयांचे रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याची माहिती शिवसेना कार्यालयात पोहचताच आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे, तालुकाप्रमुख राजेंद्र जगताप, नगरसेवक किरण देवरे, बाजार समिती सभापती तेज कवडे, माजी सभापती विलास अहेर, एकनाथ सदगिर आदी आंदोलनप्रसंगी दाखल झाले. कांदे यांनी आक्र मक भूमिका घेऊन वीज वितरणाच्या प्रतिनिधींना शिवसेना स्टाइलने फटकारले.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, नगरसेवक वाल्मीक टिळेकर आदी दाखल झाले व त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.