इंदिरानगर : पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गजानन महाराज मार्गावर सुमारे एक महिन्यापासून दोन वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम करून खड्डा करण्यात करण्यात आला होता. ते खड्डे अद्यापही बुजविण्यात आले नाही. यामुळे अपघात होऊ होण्याची शक्यता टाळता येत तातडीने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून खड्डे बुजविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.सुमारे एक महिन्यापूर्वी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा विभागाने गजानन महाराज मंदिरासमोर आणि शास्त्रीनगर बसथांबा या गजानन महाराज रस्त्यादरम्यान जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले.
भर रस्त्यातच खड्डा केल्याने वाहनधारकांच्या जीवितास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:00 IST