शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या कर्मचारी भरतीलाही स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:20 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचारी भरतीचा प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडला असून, सभापती शिवाजी चुंभळे यांनी साध्या नोकरीच्या अर्जावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या प्रकाराची राज्याचे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ भरतीला स्थगिती देतानाच, या प्रकाराची येत्या आठ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचारी भरतीचा प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडला असून, सभापती शिवाजी चुंभळे यांनी साध्या नोकरीच्या अर्जावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या प्रकाराची राज्याचे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ भरतीला स्थगिती देतानाच, या प्रकाराची येत्या आठ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. त्र्यंबकेश्वर व हरसूल येथे  बाजार समितीचे बांधकाम करण्यास अशाच प्रकारे शासनाने स्थगिती दिली होती.नाशिक बाजार समितीच्या सेवेत तिघा कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे सामावून घेण्याच्या प्रकाराबाबत संचालक रवींद्र भोये यांनी थेट जयंत पाटील यांची भेट घेऊन तक्रार केली होती.६ डिसेंबर रोजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सेवक समितीची बैठक बोलाविली होती, मात्र या बैठकीचा अजेंडा ५ डिसेंबर रोजी संचालकांना पाठविण्यात आला. भोये यांना या बैठकीचा अजेंडा १३ डिसेंबर रोजी मिळाला.एरव्ही बाजार समितीच्या बैठकीचा अजेंडा बाजार समितीच्या कर्मचाºयांमार्फत संचालकांच्या घरी पोहोचविणाºया सभापतींनी ६ डिसेंबरचा अजेंडा पोस्टाद्वारे पाठवून संचालकांना या बैठकीपासून दूर ठेवल्याची तक्रार भोये यांनी केली. इनाम प्रणालीसाठी तीन कर्मचाºयांची भरती करण्यात येत असून, त्यासाठी कोणतीही जाहिरात वा सेवा योजना कार्यालयाकडून पात्र उमेदवारांची यादी न मागविता चुंभळे यांनी फक्त साधे नोकरीचे अर्ज घेऊन त्यातील दोघांना नियुक्तीचे पत्र दिल्याचे भोये यांचे म्हणणे आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीत चालणाºया गैरप्रकाराची दखल घेत जयंत पाटील यांनी तत्काळ या नोकर भरतीला स्थगिती देण्याचे त्याचबरोबर वस्तुस्थितीची आठ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिक