नाशिक : महापालिका स्थायी समितीवरील मनसेचे सदस्य अनिल मटाले आणि सविता काळे या दोघांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर सोमवारी (दि.६) होणाऱ्या विशेष महासभेत निवड केली जाणार असून, याचवेळी मनसेच्या गटनेतेपदाबरोबरच सभागृहनेतेपदाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.मनसेने पक्षपातळीवर घेतलेल्या निर्णयानुसार सर्वांना पदांची संधी मिळावी, यासाठी स्थायीच्या सदस्यपदाचा कार्यकाळ एक वर्षांचा केला आहे. त्यानुसार पक्षाने स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीपूर्वीच मनसेच्या सदस्य सविता काळे यांचा राजीनामा मागितला होता; परंतु काळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. बऱ्याच मनधरणीनंतर अखेर सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर काळे यांनी राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. तसेच सभापतिपदाचे प्रबळ दावेदार असलेले अनिल मटाले यांना गटनेतेपदी विराजमान केले जाणार असल्याने त्यांनीही राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला. सचिन मराठे यांनी महापौरांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपूर्द केला आहे, तर वंदना बिरारी यांच्या अनुपस्थितीत सेना गटनेते अजय बोरस्ते व सौ. बिरारी यांचे पती देवानंद बिरारी यांनी महापौरांकडे राजीनामा सोपविल्याने महापौरांनी त्याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, महासभेत मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांच्या जागेवर अनिल मटाले, तर सभागृहनेते शशिकांत जाधव यांच्या जागेवर सलीम शेख यांची नियुक्तीही घोषित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सभागृहनेतेपदाचीही घोषणा होण्याची शक्यता
By admin | Updated: April 6, 2015 01:14 IST