पंचवटी : कृष्णनगरमधील एका बंगल्यात घुसून भरदिवसा चांदीच्या पादुका चोरणाऱ्या म्हसरूळ येथील संशयिताला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वामनराव बाबूराव घोटे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. कृष्णनगर येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घोटे याने मयूर चंद्रकांत इंदाणी यांच्या बंगल्यात प्रवेश करून बंगल्यातील मंदिराजवळ असलेल्या ४५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका चोरी केल्या. सदरचा प्रकार इंदाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घोटेला ताब्यात घेतले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घोटे याकडून पादुका ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)
चांदीच्या पादुका चोरणारा संशयित ताब्यात
By admin | Updated: July 17, 2016 00:19 IST