शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मांस वाहून नेणारे कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 6, 2017 03:15 IST

निफाड : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयित मांस वाहतूक करणारे तीन कंटेनर पाठलाग करून पकडून दिल्यानंतर हे कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले

 लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयित मांस वाहतूक करणारे तीन कंटेनर पाठलाग करून पकडून दिल्यानंतर हे कंटेनर निफाड पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर कंटेनरमधून कायदेशीर कागदपत्रांची वाहतूक केली जात असल्याचे तपासाअंती पोलिसांनी सांगितले. मात्र उपस्थित बजरंग कार्यकर्ते यांच्यासह निफाड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी याप्रश्नी सखोल चौकशी करावी, अशी मागणी लावून धरल्यानंतर रात्री उशिरापर्यंत याप्रश्नी खल सुरू होता. नैताळे येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते समाधान कापसे, स्वरूपानंद बोरगुडे, बापू गुंजाळ, प्रशांत कुंदे, शिरीष कोटकर, ज्ञानेश्वर सोनवणे यांना विंचूर येथील त्रिफुलीवर पाच कंटेनर निफाडकडे येताना दिसले. त्यांना या कंटेनरमध्ये जनावरांचे मांस असल्याचा संशय आला. या कार्यकर्त्यांनी या कंटेनरचा पाठलाग सुरू केला. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे यांना मोबाइलवरून सदर घटनेची माहिती कळविली. अनिल कुंदे हे निफाड येथील शांतीनगर त्रिफुली येथे कार्यकर्त्यांसह हजर झाले. या त्रिफुलीवर बजरंग कार्यकर्ते यांच्यासह आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी यातील तीन कंटेनर अडवले. मात्र दोन कंटेनचालक कंटेनर घेऊन फरार होण्यास यशस्वी झाले. यानंतर निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कंटेनर निफाड पोलीस ठाण्यात आणले. चालकांची चौकशी सुरू केली. याप्रसंगी निफाड पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.