पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिळकोस ते कळवण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गत पाच वर्षांपासून या रस्त्याची देखभाल होत नसून, अनेक छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले असून, संबंधित विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.या रस्त्यावर अनेक ठिकाणी बाभळीच्या झाडांनी आक्रमण केले असून, खड्ड्यांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच दिशादर्शक फलक आणि साइडपट्ट्या उखडल्याने मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता नाशिकला जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्याने वाहनांची सतत वर्दळ असते.----------------वाहनचालकांना आजारया भागातील शेतकरी दररोज मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक करतात. मात्र रस्त्याची चाळण झाली असल्याने शेतमालासह वाहनांचे नुकसान होते. तसेच वाहनधारकांना पाठदुखी व मणक्याचे विकार जडत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरवस्था दूर करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे दादाजी जाधव, शांताराम जाधव, राहुल सूर्यवंशी, उत्तम मोरे, राहुल आहेर, केवळ वाघ, सचिन वाघ, बुधा जाधव, रामदास आहेर, अभिजित वाघ, दुर्गेश सूर्यवंशी, नानाजी मोरे, निखिल जाधव, युवराज शिंदे, नंदू पवार, उत्तम बोरसे, भारत पवार, किरण सोनवणे आदींनी केली आहे.--------------पिळकोस ते कळवण हा रस्ता सर्वत्र खड्डेमय झाला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. अपघाताचे प्रमाण वाढले असून, रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास जनआंदोल उभे करावे लागणार आहे.- दादाजी जाधव, शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष, पिळकोस
पिळकोस रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:27 IST