शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव शाळेच्या इमारतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 14:04 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षटकोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून परिसरात गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षटकोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून परिसरात गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, एकाच शाळेच्या इमारतीत १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.  कोविड प्रादुर्भावमूळे राज्यातील शाळा, महाविद्यालये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी शाळा,महाविद्यालये सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात शाळेमध्ये बसायला पुरेशी जागा नसेल तर विद्यार्र्थी येण्यास कचरतात. परिणामी, विद्यार्थी संख्येत घट निर्माण होऊन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. सद्यस्थितीत देवगाव येथील जि. प. शाळेची एकच ईमारत सुस्थितीत असून त्यामध्येच १ ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोंबून अध्ययन केले जाते. देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेची षटकोनी इमारत सुस्थितीत नसून तीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. भविष्यात केव्हाही शाळा होतील तेव्हा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बसायचे कसे? हा प्रश्न ठाकला आहे. या शाळेचे त्वरित नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सन २००७-०८ ते २००८-०९ मध्ये जिल्हा परिषदने लाखो रुपये खर्चून दोन षटकोनी शाळा देवगाव येथे बांधल्या होत्या. आज बावीस वर्षांनंतर त्या शाळांची अवस्था नाजूक झाली असून स्लॅबमधून पाणी गळतंय, खिडक्यांची दुरवस्था झाली असून इमारत वापरण्यायोग्य नसून धोकादायक आहे. वारंवार पाठपुरावा करूनही या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण होत नाही. विद्यार्थ्यांची परवड लक्षात घेऊन लवकरात लवकर शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक