शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

ताटातून तूरडाळ गायब...

By admin | Updated: October 8, 2015 00:41 IST

महागाईचा वणवा : संध्याकाळचा ‘मेनू’ बदलला; १७० रुपये प्रतिकिलो

नाशिक : भाजपा सरकार व दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्व सर्व देशाला ‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न दाखविले मात्र वर्षपूर्तीनंतरही देशवासीयांना ‘अच्छे दिन’ आलेले नाही. उलट महागाईचा वणवा देशभर पेटला असून जीवनावश्यक वस्तूंबरोबरच मिठापासून पिठापर्यंत सर्वच महागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तूरडाळीचे दर तर थेट आकाशाला भिडल्याने ताटातून तूरडाळ गायब झाली आहे.संध्याकाळच्या भोजनात बहुसंख्य घरात गृहिणींचा ठरलेला ‘मेनू’ म्हणजे तिखट वरण किंवा साधे वरण-भात; मात्र तूरडाळ थेट दोनशे रुपये किलो झाल्यामुळे हा ‘मेनू’ कोलमडला असून वरण खाण्याचा मोह आवरता घ्यावा लागत आहे. तूरडाळ १५०-१७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचल्याचे किराणा विक्रेत्यांनी सांगितले. तूरडाळीबरोबरच सर्वच किराणा मालाची दरवाढ झाली आहे. हरभरा दाळीपासून तर कच्चे उडीदपर्यंत भाववाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात भाववाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईच्या वरवंट्याखाली पिचून निघत आहे. उत्पन्न कमी महागाई अधिक अशी स्थिती निर्माण झाल्याने नोकरदार वर्गाचे मासिक नियोजन कोलमडून पडले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडीनुसार भोजन उपलब्ध क रणे, महागाईमुळे वस्तू खरेदीचे घटलेले प्रमाण व मासिक नियोजन यामुळे गृहिणींना स्वयंपाकघरातील व्यवस्थापन करताना नाकीनव येत आहे.