शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महादेवाच्या दरीतील पुजा-याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 19:06 IST

शहराच्या दाक्षिणेस असलेल्या महादेवाच्या दरीतील श्रीक्षेत्र महादेव मंदिरात पूजापाठ करणाऱ्या बाबांचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयितास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पेठ : शहराच्या दाक्षिणेस असलेल्या महादेवाच्या दरीतील श्रीक्षेत्र महादेव मंदिरात पूजापाठ करणाऱ्या बाबांचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयितास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पेठ शहराच्या पाठीमागील बाजूस महादेवाच्या दरीत महादेवाचे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी गत १५ वर्षांपासून मौनी जंगलीदास महाराज यांचे एका कुटीत वास्तव्य आहे. त्यांच्या समवेत असलेले शिष्य मोतीराम मल्हारी राऊत (राऊतबाबा) हे नियमित मंदिरात पूजापाठ व देखरेखीचे काम करत असत. जंगलीदास महाराज स्वत:च्या औषधोपचारासाठी पेठ येथे आले असल्याने राऊत बाबा एकटेच असल्याची संधी साधून प्रभाकर किसन शार्दूल, रा. देवगाव याने कुटीत शिरण्याचा प्रयत्न केला. शार्दुल त्यास गांजाचे व्यसन असल्याने राऊतबाबांनी त्यास प्रतिकार करत कुटीतून बाहेर काढले. पैशाची मागणी करून जवळच असलेल्या टणक वस्तूने संशयिताने बाबांच्या डोक्यावर, चेहºयावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबांचा जागीच मृत्यू झाल्याने संशयित शार्दुल याने मृतदेह दरीत फेकून दिला. दोन दिवसांपूर्वीच संशयित कुटीत येऊन पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन गेला होता असे सांगण्यात आले. मंदिरात आलेल्या भक्तांना राऊतबाबा आढळून आले नसल्याने परिसरात शोध घेतला असता दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.याबाबत जंगलीदास महाराज यांनी पेठ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी एस.पी. गोरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलीस उपनिरीक्षक आर.एम.भरसट आदींनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. संशयित प्रभाकर शार्दुल यास ताब्यात घेण्यात आले असून, पेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अतिशय निर्जन ठिकाणी असलेल्या या देवस्थानातील शिष्याचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस