शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रॅलीतून प्रदूषणमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:07 IST

जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा नाशिक स्मार्ट सिटीचे संचालक सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.या सायकल रॅलीत पाणी वाचवा, सायकल चालवा फिट रहा आणि शहर प्रदूषणमुक्त ठेवा असा संदेश दिला गेला. सायकल रॅलीच्या सुरु वातीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बोलताना सांगितले की, सायकल सोपा व्यायाम आहे. सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते. व्यायामासाठी जास्त खर्चही येत नाही. सर्वांसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सायकल चालवत सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाला नाशिक स्मार्ट सिटीचे पर्यावरण महाव्यवस्थापक सुनील विभांडिक, हक्सी सायकलचे व्यवस्थापक सचिन मोरे, नाशिक सायकलिस्ट प्रवीण खाबिया आदी उपस्थित होते. सायकल रॅलीत नाशिक शहरातील युवक-युवती, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सकाळी निघालेल्या सायकल रॅलीचा नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान, मायको सर्कल, त्र्यंबकरोड सर्कल, सिटी मॉलरोड, मायको सर्कल, चांडक सर्कल, एसएसके हॉटेल येथे समारोप झाला.सायकलमुळे प्रदूषण कमी होण्यास मदतस्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहरात शंभर सायकल स्टॅण्ड व एक हजार सायकली उपलब्ध केल्यामुळे नाशिक शहरात सायकलचा वापर करणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही सायकल चळवळ सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय आॅफिस, खासगी कंपन्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सायकलमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते यासाठी सर्वांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असे याप्रसंगी जिल्हाधिकारी मांढरे यांनी बोलताना सांगितले.

टॅग्स :environmentवातावरणCyclingसायकलिंग