शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

दुसऱ्या शाहीस्नानालाही गोदावरीचे पाणी प्रदूषित

By admin | Updated: April 11, 2016 00:08 IST

मंत्राज्चा निष्कर्ष : तपोवनात आढळले साडेचार कोटी जीवाणू , ध्वनिप्रदूषणाचाही उच्चांक

नाशिक : दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीला हजारो भाविकांनी गोदापात्रात डुबकी लगावली होती. पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी गोदापात्राच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी ‘मंत्राज’ संस्थेने घेतले होते. दरम्यान, तपोवन येथे नदीपात्रात सर्वाधिक साडेचार कोटी जंतू आढळून आल्याचा निष्कर्ष तपासणी अहवालामध्ये काढण्यात आला आहे.पहिल्या शाहीस्नानाच्या तुलनेत दुसऱ्या शाहीस्नानाला भाविकांची मोठी गर्दी गोदाकाठावर उसळली होती. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने गंगापूर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी खळाळली होती. त्यामुळे भाविकांचाही आनंद द्विगुणित झाला होता. दुसऱ्या शाहीस्नानानंतर मंत्राजच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने जलप्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी गोदाकाठावर चार ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले होते. दरम्यान, तपोवनात सर्वाधिक साडेचार कोटी इतके कॉलीफॉर्म नावाच्या जीवाणूंचा समूह, तर रामकुंडात २४ लाख आणि अहल्यादेवळी होळकर पुलालगत दोन लाख इतके जीवाणू आढळून आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकानेही जलप्रदूषणाची पडताळणी करण्यासाठी गोदापात्रातील पाण्याचे नमुने तपासले होते. पर्वणीच्या काळात घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल मंडळाकडून सादर केला जात नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत मंडळाचे कान टोचले होते. त्यानंतर मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना तपासणी अहवाल सादर करण्यात आला होता. सदर अहवालानुसार कुंभमेळ्याच्या कालावधीत कुठल्याही शाहीस्नानाला नदीपात्र प्रदूषित झाले नाही. पाण्यामध्ये जैव रासायनिक व रासायनिक प्राणवायूची पातळीदेखील मर्यादेपेक्षा अधिक वाढली नसल्याचा दावा करण्यात आला होता. एकूणच गोदावरी प्रदूषणमुक्त राहिल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काढला होता; मात्र त्यांच्या अहवालाची मंत्राज या खासगी कंपनीने केलेल्या तपासणी अहवालासोबत तुलना केली, तर संपूर्ण विरोधाभास असल्याचे दिसून येते. यामुळे मंडळाचा अहवाल हा शासकीय दृष्टिकोनातून तयार करण्यात आला होता की काय, असा प्रश्न उपस्थित होते आहे. ध्वनी प्रदूषणानेही उच्चांक गाठल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)