शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लाचखोर प्रादेशिक व क्षेत्र अधिकारी जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 02:01 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २ मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी (वय ५७, रा. औरंगाबाद), क्षेत्र अधिकारी संशयित कुशल मगननाथ औचरमल (वय ४२) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देभ्रष्टाचाराचे ‘ प्रदूषण कारखान्यासाठी लागणाऱ्या संमतीपत्र करिता घेतली तीस हजारांची लाच

नाशिक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २ मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधिकारी प्रवीण मनोहर जोशी (वय ५७, रा. औरंगाबाद), क्षेत्र अधिकारी संशयित कुशल मगननाथ औचरमल (वय ४२) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अहमदनगर येथील गोल्ड काउन्सिलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉलमार्किंग सेंटरचा कारखाना सुरु करण्यासाठी संबंधित तक्रारदार उद्योजकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संमतीपत्र करिता अर्ज व मूळ कागदपत्रे दाखल केली होती. यानंतर औरंगाबाद येथील प्रादेशिक अधिकारी तथा नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त पदभार सांभाळणारे वर्ग एकचे प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी व नाशिक येथील कार्यालयातील क्षेत्र अधिकारी कुशल औरचमल यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी १५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालय गाठून हकीगत सांगत तक्रार अर्ज दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांनी गंभीर दखल घेत तक्रारीची पडताळणी करत सापळा कारवाईचे आदेश दिले. यानंतर पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरूड आदींच्या पथकाने सापळा रचला. लाचखोर जोशी व औरचमल यांनी तक्रारदाराकडून प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच पंचांसमक्ष सातपूर जवळील उद्योग भवनातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात स्वीकारली. यावेळी सापळा कारवाईच्या पथकाने या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सातपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. यावर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अद्यापपर्यंत झालेली ही पहिलीच सापळा कारवाई आहे. दोन वर्षांपुर्वी अशाच प्रकारे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते.

--इन्फो--

औरंगाबाद येथे मुळ नेमणूक ; नाशिकचा अतिरिक्त पदभार

प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी यांची नेमणूक औरंगाबादच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपविण्यात आला होता. यादरम्यान, संमतीपत्र करिता दोघा अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बेकायदेशीरपणे रक्कम अर्जदाराकडून स्वीकारली. यामुळे पुन्हा एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.

---

टॅग्स :NashikनाशिकBribe Caseलाच प्रकरणArrestअटक