शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग दहाच्या पोटनिवडणुकीसाठी २३ जूनला होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:42 IST

लोकसभा निवडणूक संपत नाही तोच महापालिकेच्या सातपूर विभागातील दहा ड या एका जागेसाठी २३ जूनला निवडणूक होणार असून, त्यानंतर चोवीस तारखेला फैसला होणार आहे.

नाशिक : लोकसभा निवडणूक संपत नाही तोच महापालिकेच्या सातपूर विभागातील दहा ड या एका जागेसाठी २३ जूनला निवडणूक होणार असून, त्यानंतर चोवीस तारखेला फैसला होणार आहे.सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा ड जागेवरील नगरसेवक सुदाम नागरे यांचे गेल्या वर्षी जुलै महिन्यात निधन झाले. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ एकने घटून ६५ वर आले होते. गेल्या वर्षभरापासून या एका जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. आता निवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी १० एप्रिल २०१९ रोजी अस्त्विात असलेल्या विधानसभेची मतदार यादी असून, ती प्रारूप यादी हरकती आणि सूचनांसाठी जाहीर केली आहे. नव्याने या मतदार यादीत मतदारांची वाढ झाली आहे. आता या प्रभागाची मतदार संख्या २८ हजार ५६ हजारपर्यंत पोहोचली आहे. येत्या सोमवारी (दि. २७) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर आता येत्या ३० मेपासून ६ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवधी आहे. ७ जून रोजी दाखल अर्जांची छाननी करण्यात येईल. १० जूनपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर २३ जून रोजी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, तर २४ तारखेला मतमोजणी होईल.बिनविरोध निवडीसाठी हालचालीमहापालिकेत सेना-भाजपाची युती झाल्याने आता ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागरे यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत असून, सहानुभूतीच्या आधारे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक