शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वंचित आघाडीकडे वळलेले मतदान;  तिसऱ्या पर्यायाचा भक्कम पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:43 IST

वंचित घटकांच्या व्होटबॅँकेवर राजकारण करणाºया प्रस्थापित राजकीय पक्षांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने चांगलीच चपराक दिली. वंचित आघाडीकडे वळालेल्या दलित मतांमुळे यापुढील राजकारणाची दिशादेखील बदलली जाणार असल्याने संकेत मिळाले असून, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरा पर्याय उभा करण्यासाठी घेतलेली राजकीय भूमिका फलद्रुप होताना दिसत आहे.

नाशिक : वंचित घटकांच्या व्होटबॅँकेवर राजकारण करणाºया प्रस्थापित राजकीय पक्षांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने चांगलीच चपराक दिली. वंचित आघाडीकडे वळालेल्या दलित मतांमुळे यापुढील राजकारणाची दिशादेखील बदलली जाणार असल्याने संकेत मिळाले असून, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरा पर्याय उभा करण्यासाठी घेतलेली राजकीय भूमिका फलद्रुप होताना दिसत आहे. या निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी तब्बल एक लाख दहा हजारांपेक्षा अधिक मते घेतल्याने वंचित आघाडीने आपले अस्तित्व सिद्धही केले.अवघ्या सहा महिन्यांचा हा पक्ष मात्र सर्वच्या सर्व जागा लढविण्याचे धाडस त्यांनी दाखविल्याने मतदारांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे उभे राहण्याची ठाम भूमिका घेतली हे मतदानातून दिसून आले. पवन पवार यांना लाखाच्या पुढे तर दिंडोरीतून बर्डे यांना ५० हजारांपेक्षा अधिक मिळालेल्या मतदानामुळे वंचित आघाडीने केवळ आपले अस्तित्व दाखवून दिले असे नाही, तर दलित, मुस्लीम मतांना गृहित धरणाºया पक्षांना चांगलीच चपराकही दिली.या निवडणुकीत एकत्र आलेली दलित, मुस्लीम मते आगामी काळात राज्याच्या राजकारणात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अत्यंत कमी वेळेत वंचित आघाडीला नाशिकमध्ये झालेले मतदान पाहता वंचित आघाडीचा आगामी काळात मोठी ताकद उभी करेल असे आशावादी चित्र नक्कीच आहे. प्रकाश आंबेडकर दलित, वंचितांची मते आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाल्याने राजकारणात वंचित आघाडीचे महत्त्व वाढलेच शिवाय याच मतदारांच्या बळावर नाशिकमध्ये आता नवी ताकद उदयास येऊ शकते ही धास्ती इतर पक्षांना नक्कीच बसणार आहे.मतदारांनी दिली पसंती : मोठे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार रिंगणात असतांनाही अवघ्या सहा महिन्यात उभ्या राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मोठे मतदान झाल्याने या मतांचा टक्का दुर्लक्ष करून चालणारा नाही. शहरातील दलित, बहुजन तसेच मुस्लीम बहुल भागातून वंचित आघाडीला मतदान झालेच शिवाय देवळाली, इगतपुरी, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यमधूनदेखील मतदान झाल्याने दलित मते एकवटल्याचे अधोरेखित झाले. कोणतीही मोठी पूर्वतयारी आणि आर्थिक पाठबळ नसतांनाही ज्या ताकदीने दलित मते एकवटली ती मते आगामी काळात मोठी निर्णायक भूमिका बजावतील हे लाखांच्या मतांनी दाखवून दिल्याने राजकारणात वंचित आघाडीचे महत्त्व वाढले आहे.लाखोंचे मतदान : वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना एक लाखांपेक्षा अधिक मिळालेल्या मतदानामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या निवडणुकीची आठवण अनेकांना झाली. गायकवाड यांना १९५७ आणि १९६२ मध्ये नाशिकमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर आता पवार यांना ते मिळाले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर