शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

युवक कॉँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी रविवारपासून मतदान

By श्याम बागुल | Updated: September 8, 2018 16:58 IST

खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कॉँग्रेस पक्षाने सुरू केली असून,दर तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या वेळी नाशिक लोकसभा मतदार संघ मिळून शहर अध्यक्षपद राखीव गटासाठी तर दिंडोरी मतदार संघ मिळून जिल्हाध्यक्षपद

ठळक मुद्देजिल्ह्यात ४२ उमेदवार : आॅनलाईन होणार मतदान जिल्ह्यातील ९७०० क्रियाशील कार्यकर्ते आपला मतदानाचा हक्क बजावतील.

नाशिक : युवक कॉँग्रेसच्या विधानसभा मतदार संघ प्रमुख निवडीबरोबरच शहर व जिल्हाध्यक्ष निवडीसाठी रविवारपासून जिल्ह्यात आॅनलाईन पद्धतीने मतदान घेण्यात येणार असून, या निवडणुकीसाठी ४२ उमेदवार रिंगणात असल्याने जिल्ह्यातील ९७०० क्रियाशील कार्यकर्ते आपला मतदानाचा हक्क बजावतील.खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कॉँग्रेस पक्षाने सुरू केली असून,दर तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या वेळी नाशिक लोकसभा मतदार संघ मिळून शहर अध्यक्षपद राखीव गटासाठी तर दिंडोरी मतदार संघ मिळून जिल्हाध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव होते. यंदा शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष दोन्ही पदे सर्वसाधारण गटासाठी ठेवण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातील चार व इगतपुरी विधासभा मतदार संघातून एक शहराध्यक्ष तर उर्वरित दहा विधानसभा मतदार संघातून एक जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी युवक कॉँग्रेसचे जिल्ह्यात ९७०० क्रियाशील कार्यकर्ते मतदान करतील. प्रत्येकाला पाच मते देण्याचा अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघ प्रमुखपदाबरोबरच प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महसचिव व शहराध्यक्षाला मतदान करावे लागणार आहे. जिल्ह्यात या निवडणुकीसाठी ४२ उमेदवार रिंगणात असून त्यासाठी पॅनलही तयार करण्यात आले आहे. रविवारी सिन्नर, निफाड व येवला येथे तर सोमवारी दिंडोरी, कळवण, चांदवड या तालुक्यात मतदान घेण्यात येईल. मंगळवारी बागलाण, मालेगाव बाह्य, मध्य विधासभा मतदार संघात मतदान होईल. बुधवार दि. १२ रोजी दिल्लीहून या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.चौकट====

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक