शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नाशिक बाजार समितीसाठी ९४ टक्के शांततेत मतदान

By admin | Updated: July 27, 2015 00:03 IST

४२४४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नाशिक : नाशिकसह त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शांततेत पार पडलेल्या मतदानात सरासरी ९४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. मावळे यांनी दिली. नाशिक, त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांतील १५ ठिकाणी ३१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. बाजार समितीवरील वर्चस्वासासाठी शेतकरी पॅनल, आपलं पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये ही लढत झाली. ३१ मतदान केंद्रांवर ४५३५ मतदारांपैकी ४२४४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सोमवारी (दि.२७) सार्वजनिक बांधकाम विभागातील गोदावरी हॉल येथे सकाळी ८ वाजेपासून १४ टेबलवर मतमोजणी होईल. दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होऊ शकेल. बाजार समितीसाठी माजी खासदार देवीदास पिंगळे, खासदार हेमंत गोडसे व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचं आपलं पॅनल, माजीमंत्री बबनराव घोलप, महापालिका स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांचं शेतकरी विकास पॅनल व नगरसेवक दिनकर पाटील यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये तिरंगी लढत झाली. निवडणुकीत भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि अपहाराच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यामुळे मतदानाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती,परंतु पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याने असे काही घडले नाही. नाशिक बाजार समितीच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात उतरले असून, हमाल-माथाडी गटातून पिंगळे गटाचे चंद्रकांत निकम हे यापूर्वीच अनौपचारिकरीत्या बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी होणाऱ्या मतदानात सोसायटी व ग्रामपंचायत गटासाठी प्रत्येकी १४ मतदान केंद्रांचा समावेश होता, तर व्यापारी गटातील १५०७ पैकी १२८६ मतदारांनी शहरातील आर. पी. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ८५.३३ टक्के इतकी झाली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत गटातील १७८० मतदारांपैकी १७२२ इतक्या मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ९६.७४ झाली. तर सोसायटी गटातील १२४८ मतदारांपैकी १२३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सर्वाधिक ९९.०३ टक्के मतदान झाले. सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी २४, दोन महिला राखीव गटासाठी सात उमेदवार रिंगणात होते. तसेच इतर मागास प्रवर्गात तीन, तर भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या दोन्ही गटांत सरळ सरळ लढत झाली. १६८ पैकी १०४ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ जागांसाठी ६४ उमेदवार रिंगणात होते; मात्र हमाल-माथाडीच्या एका जागेसाठी एकच अर्ज असल्याने या गटातील निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. (प्रतिनिधी)