शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत खड्ड्यांवरून राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:25 IST

नाशिक : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महापौरांनी आदेश देऊनही आधी प्रशासन हालले नव्हते. मात्र आता ३० कोटी रुपयांंच्या निविदा देण्याची धावपळ सुरू झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला लक्ष्य केले असून, या खड्ड्यांना सत्ताधिकारी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे, तर भ्रष्टाचाराचे खड्डे न बुजविल्यास महापालिकेत डांबर ओतण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देतीस कोटींच्या निविदा : शिवसेना-राष्ट्रवादीने केले भाजपला लक्ष्य

नाशिक : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महापौरांनी आदेश देऊनही आधी प्रशासन हालले नव्हते. मात्र आता ३० कोटी रुपयांंच्या निविदा देण्याची धावपळ सुरू झाली आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला लक्ष्य केले असून, या खड्ड्यांना सत्ताधिकारी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे, तर भ्रष्टाचाराचे खड्डे न बुजविल्यास महापालिकेत डांबर ओतण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला आहे. शहरात यंदा खूप पाऊस झाला नाही; मात्र सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न अनेक रस्त्यांच्या बाबतीत निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस बांधकाम विभागाची बैठक घेऊन आठ दिवसात खड्डे बुजवून शहर खड्डे मुक्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप खड्डे जैसे थे आहेत. परंतु आता खड्डे बुजवण्यासाठी तीस कंत्राट काढण्याची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेचा बांधकाम विभाग व गुणवत्ता विभाग यांच्या हलगर्जीपणा शहराची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाच्या कंत्राटदारांना पोसण्याच्या उद्योगामुळे नाशिककरांना दरवर्षी खड्ड्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्यांच्या कामाचा गुणवत्ता राखण्याचा बांधकाम विभाग व मनपाचा गुणवत्ता नियंत्रण विभागाचा विसर पडल्याचा आरोप करून आम्ही मात्र ही जबाबदारी विसरू देणार नाही, असा इशारादेखील बोरस्तेंनी दिला.सिंहस्थ कुंभमेळ्यापासून आत्तापर्यंत महापाालिकेने चारशे ते पाचशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले आहेत. मात्र त्यानंतरही त्याच रस्त्यांवर खड्डे पडत असेल तर त्यास जबाबदार बांधकाम व गुणवत्ता नियंत्रण विभाग या दोघांची पोलखोल करावी लागेल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी म्हटले आहे. महापालिकेत खड्डे बुजवण्याची मोनोपाली असून, वर्षानुवर्ष तेच तेच ठेकेदार डांबरीकरणाची कामे करतात, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. ठेक्यासाठी रिंंग करून कामे मिळवायची, निकृष्ट रस्ते तयार करायचे आणि रस्त्यांवर खड्डे पडले की ठेकेदारावर कारवाई करण्याचे सोडून खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा नवीन कंत्राट काढायचे. महापालिकेतील भ्रष्टाचाराचे हे खड्डे बुजवणे गरजेचे झाले आहे. असे दुष्टचक्र महापालिकेत असून, आता खड्डे बुजवणे जमत नसेल तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डांबर घेऊन हे काम करण्यास तयार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण