शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
3
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
4
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
7
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
8
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
9
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
10
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
11
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
12
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
13
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
14
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

वस्त्रांतरगृह पाडण्यामागे दडले राजकारण

By admin | Updated: January 10, 2015 00:30 IST

महंतांचे ‘बळे-बळे’ फुंकले कान : पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचेही प्रकटले अज्ञान; अधिकारी मात्र गोंधळले

नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडालगत चोवीस वर्षांपूर्वी महिला भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली वस्त्रांतरगृहाची इमारत पाडण्याचा मुद्दा गुरुवारी झालेल्या सिंहस्थविषयक बैठकीत अचानक उपटला आणि लोकप्रतिनिधींनीही सुरात सूर मिसळविल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुठल्याही पर्यायांचा विचार न करता थेट वस्त्रांतरगृहच पाडून टाकण्याचा फतवा काढला. मात्र, वस्त्रांतरगृह पाडण्यामागील राजकारणावर आता प्रकाशझोत टाकला जात असून, कुणीतरी ‘बळे-बळे’ कान फुंकत आखाडा परिषदेचे कथित अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या मुखातून तो प्रसवण्याची व्यवस्था केल्याची चर्चा रंगली आहे. अचानक कोसळलेल्या या मुद्यावर अधिकारीवर्गातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, श्री गंगा गोदावरी मंदीर पंचकोठी पुरोहित संघाने वस्त्रांतरगृहाची इमारत पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला असून, कोणत्याही परिस्थितीत इमारतीला हात लावू दिला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सिंहस्थविषयक बैठकीत रागकुंडाभोवतालच्या अतिक्रमणाची आणि मंदिरांच्या देखभाल-दुरुस्तीची चर्चा सुरू असतानाच महंत ग्यानदास यांनी साधू-महंतांना रामकुंडात स्नानासाठी अडथळा ठरणारी वस्त्रांतरगृहाची इमारत पाडून टाकण्याची सूचना केली आणि उपस्थित आमदारांनीही त्याबाबत माना डोलावत संमती देऊन टाकली. लोकप्रतिनिधी म्हणतात म्हणून पालकमंत्र्यांनीही कसल्याही चर्चेच्या भानगडीत न पडता वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश देऊन टाकले. अवघ्या मिनिटभरात हा विषय चर्चेला आला आणि कुणालाही मूळ प्रश्न समजायच्या आत त्यावर निर्णयही दिला गेला. बैठक संपल्यानंतर या निर्णयाचे स्थानिक पुरोहितांमध्ये मात्र तीव्र पडसाद उमटले आणि उपस्थित अधिकारीवर्गातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वस्त्रांतरगृहाचा विषय नेमका आला कुठून आणि तो महंतांच्या मुखातून कुणी वदवून घेतला याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या असून, पुरोहित संघाने तर वस्त्रांतरगृह पाडण्याविरोधात दंडच थोपटले आहेत. सद्य:स्थितीत वस्त्रांतरगृहाच्या इमारतीत पुरोहित संघाचे कार्यालय असून, यात्रेकरुंना अल्प दरात लॉकर्सची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.