शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांची ईव्हीएम उदासीनता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:18 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविले असून, नव्याने दाखल होणाऱ्या या यंत्राबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती देण्यास निवडणूक आयोग उत्सुक असले तरी राजकीय पक्षांची मात्र उदासीनता कायम असल्याचे निदर्शनास आले आहे.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविले असून, नव्याने दाखल होणाऱ्या या यंत्राबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती देण्यास निवडणूक आयोग उत्सुक असले तरी राजकीय पक्षांची मात्र उदासीनता कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत एकाच राजकीय पक्षाला बहुमत मिळत असल्यामुळे सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यावर आक्षेप घेत सदरच्या मतदान यंत्रांबरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप सुरू केला आहे. यासंदर्भात न्यायालयातही दाद मागण्यात आली असून, यापुढच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने नाशिक जिल्ह्यासाठी ९२४४ बॅलेट युनिट व ५४७९ कंट्रोल युनिट बंगळुरू येथून उपलब्ध करून दिले असून, स्ट्रॉँगरूममध्ये सदरची यंत्रे ठेवण्यापूर्वी ती प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष ठेवली जावी, असे आयोगाचे आदेश असल्याने गेल्या शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवडणूक शाखेने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शुक्रवारी सकाळी दहा वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊस येथे मतदान यंत्रे उतरताना हजर राहण्याची विनंती केली होती. परंतु कॉँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड वगळता एकाही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी यावेळी हजर राहू शकला नाही.उलट सत्ताधारी पक्षाच्या एका जिल्हास्तरीय नेत्याने तर मतदान यंत्रे आहेत की भुसा भरलेल्या पेट्या असा सवाल करून निवडणूक शाखेच्या निमंत्रणाला केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानली आहे. एकीकडे मतदान यंत्रावर शंका उपस्थित करून संपूर्ण यंत्रणेला आरोपीच्या पिंजºयात उभे करायचे व दुसरीकडे यंत्रांच्या सत्यतेची माहिती जाणून घेण्याबाबत उदासीनता दाखवायची, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे.जुनी मतदान यंत्रे भंगारातराजकीय पक्षांचा ईव्हीएमवर असलेला आक्षेप पाहता तो एकप्रकारे निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यासारखे असल्यामुळे त्यातून मान सोडून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आजवर वापरण्यात आलेल्या सर्व जुनी मतदान यंत्रे भंगारात काढून नवीन अद्ययावत यंत्रे तसेच त्याला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्वच विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यावर आक्षेप घेत सदरच्या मतदान यंत्रांबरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप सुरू केला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण