शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या कोलांटउड्यांनी राजकीय पक्ष हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 01:01 IST

पाच वर्षे जनहित, सामान्यांचे प्रश्न, विकासाचे राजकारण, पारदर्शकता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता अशा मुद्यांची माळ जपणाऱ्या राजकीय पक्षांची हतबलता नगरपंचायत निवडणुकीत दिसून आली. महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते राजकीय पक्षांना झुकवत असल्याचे प्रसंगी पक्षीय उमेदवारी लाथाडून अपक्ष उमेदवारी केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. जात, धर्म व पैसा याला महत्त्व देत मतदारानुनयी भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे मोजक्या कुटुंबांच्या हातात नगरपंचायतीची सत्ता केंद्रित राहण्याची परंपरा कायम राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसहा नगरपंचायतींची रणधुमाळी शिगेला पोहोचली भाकरी फिरविण्याची वेळ उमेदवार येऊ देत नाही

बेरीज वजाबाकीमिलिंद कुलकर्णीबेसावध पक्ष, महत्त्वाकांक्षी उमेदवार

कळवण, देवळा, दिंडोरी, निफाड, पेठ व सुरगाणा या सहा नगरपंचायतींची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी मतदान होत असून, २९ दिवसांनी निकाल कळणार आहे. तत्पूर्वी निवडणुका स्थगित ठेवलेल्या ओबीसींच्या ११ जागांवर १८ जानेवारी रोजी निवडणूक होईल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावर कोणत्याच निवडणुका होणार नाही, अशा मनोभूमिकेत असलेल्या राजकीय पक्षांची सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाने केलेली त्याची अंमलबजावणी पाहता गोची झाली आहे. बेसावध असताना या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तारांबळ उडाली. सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात यश आलेले नाही, हा त्याचा दृश्य परिणाम आहे.

सर्व जागांवर उमेदवार नाहीगाव तेथे शाखा, शतप्रतिशत, वन बुथ टेन युथ, पन्ना प्रमुख असे संघटनात्मक उपक्रम पाच वर्षे राबविणाऱ्या राजकीय पक्षांना सर्व जागांवर उमेदवार मिळू नये, यावरून अभियानामधील फोलपणा स्पष्ट होतो. ८७ जागांसाठी मतदान होत आहे. त्यापैकी भाजप : ७८, राष्ट्रवादी कॉंग्रेस : ६१, कॉंग्रेस : ३३, शिवसेना : ४६ जागा लढवत आहे. दिंडोरीत काँग्रेसचे २ व शिवसेनेचे ८ उमेदवार असून, त्यांनी आघाडी केली आहे.

उमेदवारांपुढे पक्ष हतबलभाकरी फिरवली नाही तर करपते, हे तत्त्व राजकारणात हमखास लावले जात असले तरी आता भाकरी फिरविण्याची वेळ उमेदवार येऊ देत नाही, ते चूल बदलायला मागेपुढे पाहत नाही. या निवडणुकीत हे प्रामुख्याने दिसले. राजकीय पक्षांचा उमेदवारांवर भरवसा नाही आणि उमेदवारांचा पक्ष व नेत्यांवर विश्वास उरलेला नाही. राजकीय कोलांटउड्या आणि नेत्यांनी नातेवाईक, स्वीय सहायकांना दिलेली उमेदवारी हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशी जबाबदारीची पदे भूषविलेले कार्यकर्ते उमेदवारीसाठी रात्रीतून पक्ष बदलताना दिसून आले. निष्ठा, बांधिलकी हे शब्द राजकारणातून हद्दपार होत आहे, हे त्याचेच निदर्शक आहे.

महिला उमेदवारांचा दबदबाया निवडणुकीत महिला उमेदवारांचा दबदबा आहे. एकूण २९२ उमेदवारांपैकी १६० महिला उमेदवार रिंगणात आहेत. पुरुष उमेदवार १३२ आहेत. ११ ठिकाणी महिला उमेदवार या पुरुष उमेदवारांविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतानाही त्यापेक्षा अधिक महिला उमेदवार उभे राहणे, स्त्रीसशक्तीकरणाच्यादृष्टीने स्वागतार्ह पाऊल आहे. अर्थात या सर्वसामान्य महिला किती आणि प्रस्थापित कुटुंबातील महिला किती हादेखील शोध घ्यायला हवा. पेठमध्ये २३४५ महिला मतदार, तर पुरुष मतदार त्यापेक्षा कमी म्हणजे २२९१ आहेत. कळवणमध्ये पुरुष : ७८३५, तर महिला : ७५६८ मतदार, निफाडमध्ये पुरुष : ८६६२, महिला : ८५११ मतदार आहेत. याचा परिणाम असू शकतो. 

टॅग्स :Nashikनाशिक