शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

राजकीय घराणी खालसा

By admin | Updated: February 26, 2017 00:23 IST

मातब्बर पराभूत : अनेक वारसदारांना फटका

नाशिक : शहराच्या राजकारणात दीर्घ काळापासून आपला दबदबा टिकवून ठेवणाऱ्या काही घराण्यांमधील वारसदारांना महापालिका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक मातब्बरांना प्रतिस्पर्ध्यांनी धूळ चारल्याने संबंधित घराण्यांच्या राजकारणावरही त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.  महापालिका निवडणुकीत वर्षानुवर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या काही घराण्यांचे पुढचे वारसदारही पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरलेले होते. त्यात प्रामुख्याने, शहराचे प्रथम महापौर स्व. शांताराम बापू वावरे यांचे भाचे आणि माजी नगरसेवक श्रीमती निर्मलाताई कुटे यांचे सुपुत्र शैलेश कुटे यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. कुटे यांना त्यांचे एकेकाळचे सहकारी कॉँग्रेसचे पण आता भाजपाकडून उमेदवारी करणाऱ्या शिवाजी गांगुर्डे यांनी पराभूत केले. मागील निवडणुकीत कुटे यांच्या भगिनी सुजाता डेरे यांनी मनसेकडून विजय मिळविला होता. यंदा त्यांनी बंधूसाठी निवडणूक लढविली नव्हती. माजी महापौर यतिन वाघ यांचा पराभव राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी केला. यतिन वाघ यांचे वडील रघुनाथ वाघ हे भूतपूर्व नगरपालिकेत उपनगराध्यक्ष होते तर त्यांच्या आत्या सुमनताई बागले यांनी उपमहापौरपद भूषविले आहे. नाशिकरोड-देवळाली भागात दीर्घकाळ राजकारणात राहिलेल्या माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या दोन्ही कन्या तनुजा आणि नयना यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे विद्यमान आमदार आहेत, परंतु आपल्या दोन्ही मुलींना राजकीय वारसदार करू पाहणाऱ्या घोलपांना अपयश आले. उपनगर भागातून विजय ओहोळ व त्यांच्या पत्नी सुमन ओहोळ हे दाम्पत्य आलटून पालटून महापालिकेत निवडून येत आहे. यंदा मात्र विजय ओहोळ यांनी संधी घेतली, परंतु पक्षांतराचा फटका बसत त्यांना पराभवाची झळ पोहोचली. सिडकोत पाटील घराणेही दीर्घकाळापासून राजकारणात आहेत. केशवराव पाटील व दत्ता पाटील हे बंधू यापूर्वी महापालिकेत निवडून आले होते. यंदा केशवराव पाटील यांचे सुपुत्र राम पाटील यांनी उमेदवारी केली, परंतु त्यांनाही पराभव पत्करावा लागला. अनिल मटाले यांचीही तीच स्थिती बनली. माकपाचे तानाजी जायभावे व वसुधा कराड हे भाऊ-बहीणसुद्धा पराभूत झाले. यंदा महापालिकेत माकपचा सदस्य दिसणार नाही. त्याचबरोबर लक्ष्मण जायभावे यांनाही पराभवाचा धक्का बसला. शिक्षण सभापती संजय चव्हाण व त्यांच्या कन्या स्नेहल चव्हाण यांना मतदारांनी नाकारले. चव्हाण कुटुंबीय दीर्घ काळापासून राजकारणात आहेत.