शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

निफाड तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली

By admin | Updated: February 25, 2017 00:06 IST

कही खुशी कही गम : मतदारांचा चांगुलपणा, सर्वच पक्षांना विचारपूर्वक फटकारे

निफाड : तालुक्यातील निवडणुकीत जनतेने सर्वच पक्षांना विचारपूर्वक फटकारे मारीत जमिनीवर आणले असून, त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पदरात यश देताना पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचविले आहे. शिवाय पक्षांतराच्या उड्या मारणाऱ्या नेत्यांना एक-दोन अपवाद वगळता पराभवाचे धनी केले आहे. जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचाही इशारा निफाडच्या जनतेने सर्वच पक्षांना दिला आहे.  मागील निवडणुकीत सेनेला विंचूर, निफाड, कसबे सुकेणे, ओझर, चांदोरी या पाच गटांत यश मिळाले होते, तर राष्ट्रवादीला पालखेड, लासलगाव या दोनच गटाच्या जागा मिळाल्या होत्या. भाजपाला सायखेडा गट तर कॉँग्रेसला पिंपळगाव बसवंत गटावर विजय मिळाला होता. देवगाव गटात अपक्ष किरण थोरे विजयी झाल्या होत्या. पाच वर्षांनंतर यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला कसबे सुकेणे, उगाव व पिंपळगाव बसवंत या तीनच गटात यश मिळाले.  या निवडणुकीत सेनेच्या दोन जागा कमी झाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला सायखेडा, पालखेड, चांदोरी, देवगाव, विंचूर अशा पाच जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या तीन जागा वाढल्या. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सायखेडा व चांदोरी हे गट ताब्यात घेतल्याने सेनेला हा हादरा मानला जातोय. भाजपाला मागील निवडणुकीत सायखेड्याची एक जागा मिळाली होती. यावर्षी ती एक संख्या कायम ठेवत लासलगाव गट ताब्यात घेऊन या गटात भाजपाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. यतीन कदम यांनी ओझर नागरी आघाडीतर्फे या गटात विजय मिळवून सेनेच्या बालेकिल्ल्यात पुढच्या राजकीय वाटचालीचा इशारा दिला आहे. या निवडणुकीत चार जागा लढवणाऱ्या कॉँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या तालुक्यात कॉँग्रेसची अशी अवस्था कशी झाली यासाठी नेत्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.उगाव गटात कॉँग्रेसमधून सेनेत प्रवेश केलेले लासलगाव कृउबाचे संचालक बाळासाहेब क्षीरसागर यांनी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचे बंधू लासलगाव कृउबाचे संचालक भास्कर पान गव्हाणे यांचा पराभव केला. या गटात लासलगाव कृउबाचे संचालक राजेंद्र डोखळे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले भाजपाचे संदीप तासकर याना मिळालेली मते उल्लेखनीय आहेत. पूर्वीचा निफाड आणि आताचा उगाव गट सेनेने राखून हा गट आपल्याकडेच ठेवण्यात सेनेला यश मिळाले आहे. याच उगाव गटातील उगाव गण सेनेने जिंकला तर कोठूरे गणात कॉग्रेसच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी सुभाष कराड विजयी झाल्या. विशेष म्हणजे त्यांना कॉग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा सामना करावा लागला.  देवगाव गणातून अपक्ष उमेदवार पिंपळगाव कृउबाचे संचालक गुरु नाथ कांदे यांनी विजय मिळवला तर खेडलेझुंगे गणात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे ओझर गटात आमदार कदम यांनी गटात आणि दोन्ही गणात सेनेचे उमेदवारच दिले नाही. त्यांचा हा निर्णय शिवसैनिकांना अचंबित करणारा होता या चर्चेला तालुक्यात उधाण आले होते. ओझर नागरिक आघाडीचे यतीन कदम यांनी स्वत:सह या आघाडीचे ओझर आणि ओझर टाऊन शीप गणातील उमेदवार निवडून आणले. यतीन कदम यांच्या विजयानंतर ते पुढील कोणते राजकीय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विंचुर गटातून किरण पंढरीनाथ थोरे या पुनश्च निवडून आल्या याच गटातिल विंचुर गणातून भाजपचा तर डोगरगाव गणातून सेनेचा उमेदवार निवडून आला आहे   लासलगाव गटात तर भाजपाचे ज्ञानेश्वर जगताप निवडून आले. राष्ट्रवादी कॉग्रेसमधून सेनेत प्रवेश केलेले लासलगाव कृउबाचे सभापती जयदत्त होळकर यांच्या पत्नी वेदिका होळकर यांना पराभव पत्करावा लागला.  जयदत्त होळकर यांचे राजकीय वैर सर्व तालुक्याला माहित आहे याच गटातिल लासलगाव गणातून मात्र नानासाहेब पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील निवडून आल्या. तर खड्कमाळेगाव गणातून सेनेचा उमेदवार निवडून आला. लासलगाव कृउबाच्या निवडणुकीत जयदत्त होळकर यांचे पॅनलला बहुमत मिळाले होते तर नानासाहेब पाटील यांच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला होता. नानासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र मागील राजकीय हिशोब चुकता केला.पिंपळगाव बसवंत गटात सेनेच्या ज्योती वागले निवडून आल्या त्या गटातील पिंपळगाव बसवंत गण आण िउंबरखेड गणात सेनेने विजय मिळवला कसबे सुकेणे गट सेनेने मात्र यंदा हि राखला या गटातील कसबे सुकेणे गण आण ि नारायणगाव गणात सेनेचे उमेदवार विजयी झाले   थोडक्यात निफाडच्या जनतेने सेनेला आण िराष्ट्रवादी कॉग्रेसला समान धडा शिकवला जि. प च्या निवडणुकीत सेनेला अवघ्या 3 जगावर विजय देऊन झटका देताना पंचायत समतिी निवडणुकीत सेनेला जनतेने सत्तेपर्यंत जाण्यासाठी 20 पैकी 10 जागावर विजय दिला तसेच जि. प निवडणुकीत 10 पैकी 5 जागांवर विजय देताना प.स निवडणुकीत राष्ट्रवादीला 4 जागेवर विजय दिला त्यामुळे यापुढे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेसला जनतेच्या प्रश्नावर अधिक सजग चळवळ उभी करावी लागेल त्या संधीच ते किती फायदा घेतात याकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे   कॉग्रेसला प.स कोठूरे गणांची केवळ एकच जागा मिळाली त्यामुळे या तालुक्यात कॉग्रेसला पाय रोवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल अन्यथा यापुढील राजकीय प्रवास कसा असेल हे काळच ठरवेल भाजपने या तालुक्यात आपले पाय बर्यापैकी रोवले आहेत आमदार अनिल कदम यांना नवीन शिवसैनिक आण ि निष्ठावान शिवसैनिक यांची योग्य सांगड घालत त्यांना सामान न्याय द्यावा लागेल.  पालखेड गटात माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर यांनी सेनेचे भास्कर बनकर यांचा पराभव करीत आमदार कदम यांचाही हिशोब चुकता केला आहे. भास्कर यांनी कॉग्रेसमधून नुकताच सेनेत प्रवेश केला होता. बनकर हे कॉग्रेसमध्ये असतांना अनिल कदम यांना विधानसभा निवडणुकीत उघडपणे मदत केलेली होती. किंबहुना कदम यांच्या निवडणुकीत बनकर हे राजकीय डावपेच आखण्यात सारथ्य करीत होते परंतु त्याच बनकर यांना कॉग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत पराभव बघावा लागला. त्यामुळे बनकर यांचा पराभव हा आमदार कदम यांच्या जिव्हारी लागला आहे. कारण या पालखेड गटात आमदार कदम हे स्वत: उपस्थित राहून लक्ष घालत होते . याच गटातील पालखेड गण सेनेने तर नांदुर्डी गण राष्ट्रवादीने जिंकला. देवगाव गटात स्वर्गीय डॉ. वसंत पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या. अमृता पवार यांनी मागील काही वर्षांपासून देवगाव गटात जाणीवपूर्वक आपला संपर्क वाढवला. कार्यकर्त्यांचे जाळे विणले. त्याचाच परिपाक म्हणून त्यांनाही उच्चांकी मतदान मिळाले. पवार यांनी जनतेतील पहिलाच विजय मिळवून तालुक्याच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे .त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर जनतेचे लक्ष असणार आहे. याच याच गटातील देवगाव आणि खेडलेझुंगे या दोन्ही गणात सेनेने उमदवारच दिले नाही. देवगाव गणात भाजपाने उमेदवार दिला नाही. भाजपाने देवगाव गटात उमेदवार देऊन लुटुपुटूची लढाई दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.