शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या भेटीतील व्यक्तींची पोलिसांकडून होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:42 IST

मंत्र्यांच्या दौ-यांतर्गत दिल्या जाणा-या खासगी भेटीतील व्यक्ती, कार्यकर्त्यांची आगाऊ गोपनीय माहिती गोळा करून ती मंत्र्यांना देण्याचा आदेश बुधवारी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना दिले.

नाशिक : मंत्र्यांच्या दौ-यांतर्गत दिल्या जाणा-या खासगी भेटीतील व्यक्ती, कार्यकर्त्यांची आगाऊ गोपनीय माहिती गोळा करून ती मंत्र्यांना देण्याचा आदेश बुधवारी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना दिले.सोमवारी नाशिक भेटीवर आलेले सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुन्हे दाखल असलेले करण गायकर यांच्या घरी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. मंत्री व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेता, नाशिक भेटीवर ज्या ज्या वेळी मंत्री येतील त्या त्या वेळी त्यांच्या दौºयाचा आगाऊ कार्यक्रम लक्षात घेता, मंत्र्यांना भेटणाºया व्यक्ती तसेच मंत्री भेट देणाºया ठिकाणांची गोपनीय माहिती यापुढे काढून तशी माहिती मंत्र्यांना देण्यात यावी, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना तसे पत्रही पाठवणार असल्याचे सिंगल यांनी सांगितले.मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करीत असलेल्या कार्यवाहीची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतो. नाशिकमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर गायकर यांच्या निवासस्थानी गेलो होतो, त्या वेळी सुमारे ३०० ते ४०० कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बंदद्वार चर्चा अथवा गुफ्तगू झालेले नाही.- चंद्रकांत पाटील,सार्वजनिक बांधकाममंत्रीमराठा समाजाला आरक्षण तसेच समाजाच्या अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील माझ्या निवासस्थानी आले होते. त्यात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. माझ्यावर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, त्यातून मी निर्दोष सुटेन.- करण गायकर, संस्थापक,छावा क्रांतिवीर संघटना

टॅग्स :Policeपोलिस