शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची पोलीस उपआयुक्तांकडून चौकशी

By admin | Updated: May 15, 2014 00:07 IST

गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरण

गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरणनाशिक : सराईत गुन्हेगार भीम पगारे टोळीने व्यावसायिकाचे अपहरण करून वसूल केलेल्या खंडणी प्रकरणात अटक केलेल्या गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरणी आज महापालिका विरोधी पक्षनेते, शिवसेना आणि मनसे नगरसेवकांची आज पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी चौकशी केली़ दरम्यान, ही चौकशी प्राथमिक स्वरूपाची असल्याचे बारगळ यांनी सांगितले़मोहन चांगले खून प्रकरणातील संशयित गिरीश शे˜ीवर जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये झालेला हल्ल्याच्या प्रयत्न, सराईत गुन्हेगार भीम पगारेची हत्त्या आणि त्यापूर्वी एका व्यावसायिकाचे अपहरण करून उकळण्यात आलेली खंडणी या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे राजकीय हितसंबंध असल्याच्या कथित संशयावरून सेना-मनसेच्या चार नगरसेवकांना पोलिसांनी मंगळवारी नोटिसा बजावल्या होत्या़ पोलिसांनी मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना नगरसेवक दत्तात्रय तथा डी़ जी़ सूर्यवंशी, मनसे नगरसेवक सतीश (बापू) सोनवणे यांना या नोटिसा बजावल्या होत्या़ पोलिसांनी बजावलेल्या या नोटिसीनुसार बुधवारी बडगुजर, सोनवणे आणि सूर्यवंशी हे तिघेही पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांच्या कार्यालयात हजर झाले होते़ या तिघांचीही बारगळ यांनी प्राथमिक चौकशी केली़ दरम्यान, गरज भासल्यास आणखीन काही लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावण्यात येण्याचे सूतोवाचही बारगळ यांनी केले़ (प्रतिनिधी)--कोट--गरज भासल्यास आणखी लोकप्रतिनिधींची चौकशीखंडणी प्रकरणातील गुन्हेगारांच्या चौकशीसाठी आणि तपासणीचा एक भाग म्हणून या तीनही नगरसेवकांना नोटीस देऊन बोलावण्यात आले होते़ याबाबत प्राथमिक स्तरावर ही चौकशी सुरू असून, याबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही़ या प्रकरणी गरज भासल्यास आणखीन काही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पदाधिकार्‍यांना बोलावले जाऊ शकते़- अविनाश बारगळ, पोलीस उपआयुक्त, नाशिकसंशयित प्रभागातील रहिवासीनगरसेवक हा जनतेचा सेवक असतो, त्याच दृष्टिकोनातून आमचे काम सुरू आहे़ खंडणीतील काही संशयित आमच्या प्रभागातील रहिवासी असल्याने पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती़ त्यानुसार पोलीस उपआयुक्त कार्यालयात हजर झालो़ पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करणार आहोत़- सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते, महानगरपालिकागुन्हेगारांशी संबंध म्हणून बोलावलेले नाहीखंडणीतील गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या कारणावरून आम्हाला बोलावलेले नाही़ शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे़ पोलिसांना हवी ती मदत करण्यास मी तयार आहे़- सतीश (बापू) सोनवणे, नगरसेवक, मनसेचौकशी नाही, संवाद गेल्या दहा वर्षांपासून जनतेने महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले़ पोलीस उपआयुक्तांकडे आमची चौकशी नाही, तर संवाद झाला़- डी़ जी़ सूर्यवंशी, नगरसेवक, शिवसेनागडकरी चौकातील परिमंडळ-१ च्या पोलीस उपआयुक्त कार्यालयात चौकशीसाठी आलेले नगरसेवक सतीश सोनवणे व डी़ जी़ सूर्यवंशी़