शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कसबे सुकेणेत पोलिसांचा कडक बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:18 IST

कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जाहीर केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी कसबे सुकेणे शहर व मौजे सुकेणे येथे नाकाबंदीच केली आहे. तसेच जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केले.

कसबे सुकेणे : कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जाहीर केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी कसबे सुकेणे शहर व मौजे सुकेणे येथे नाकाबंदीच केली आहे. तसेच जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केले.कसबे सुकेणे शहर व मौजे सुकेणे येथील कोरोना खबरदारी संचारबंदी व नाकाबंदीचा आढावा राणे यांच्यासह राजेश पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घेतला. कसबे सुकेणे शहरातील मेनरोड, बाजारपेठ, बसस्थानक, छत्रपती शिवाजी चौक, केआरटी रोड, मौजे सुकेणे गाव व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान दत्त मंदिर या परिसराची पाहणी करून नाकेबंदीच्या सूचना केल्या. यात्राकाळामध्ये सुस्तावलेल्या कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनामुळे खडबडून जाग आली. जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव पाटील यांनी बैठक घेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.कसबे सुकेणे येथे आतापर्यंत इंग्लंड, सुदान, अंदमान निकोबार व दुबई येथून चार व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असले तरी त्यांना १४ दिवस एकांतात राहण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.त्यांची वेळोवेळी पाहणी केली जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस