शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

मद्यपीकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

By admin | Updated: May 18, 2016 00:32 IST

नांदूरशिंगोटे : पोलीस चौकीची तोडफोड करत धिंगाणा; आरोपीस अटक

नांदूरशिंगोटे : मी दिलेल्या तक्रारी अर्जाचे काय झाले? आरोपीला अटक का केली नाही, असा जाब विचारत दापूर येथील एका मद्यपीने नांदूरशिंगोटे पोलीस चौकीत अक्षरश: धिंगाणा घातला. पोलीस चौकीतील वस्तूंची मोडतोड करण्यासह उपनिरीक्षक मुख्तार सय्यद यांची नेमप्लेट तोडून त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.दापूर येथील शिवाजी महादू आव्हाड हे रात्री ९ वाजेच्या सुमारास वावी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात गेले. आव्हाड यांची दुचाकी चौकीच्या पायऱ्यांजवळ रस्त्यात लावली. चौकीत पोलीस उपनिरीक्षक मुख्तार सय्यद व होमगार्ड आणि कामानिमित्त आलेल्या दोन-तीन व्यक्ती बसलेल्या होत्या. सय्यद यांनी दुचाकी रस्त्यातून बाजूला लावण्याची सूचना करताच आव्हाड भडकल्याचे पोलिसांनी सांगितले. आव्हाड यांनी मोठमोठ्याने बोलून मी दिलेल्या तक्रार अर्जाचे काय केले, आरोपीला अटक करा, असे म्हणून हुज्जत घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तुम्ही येथे कशाला बसले असे म्हणत त्यांनी उपनिरीक्षक सय्यद यांची नेमप्लेट तोडून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस चौकीत असलेले अ‍ॅड. संजय सोनवणे, राजेंद्र शिंदे यांनी आव्हाड यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच त्यांनी शिंदे यांना चप्पलने मारहाण केली. आव्हाड यांनी चौकीतील आरसा व खुर्चीची मोडतोड करीत साहित्य अस्ताव्यस्त फेकले. याप्रकरणी उपनिरीक्षक सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी शिवाजी आव्हाड याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व मारहाण करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी संशयित आरोपी आव्हाड यास अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केली. आव्हाड हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)