पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून पंचवटी परिसरात जागोजागी लोखंडी बॅरिकेट टाकून तटबंदी केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.शनिवारी पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली औरंगाबाद नाक्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट टाकून रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी अचानक बंद केलेल्या या रस्त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय तर झालीच शिवाय इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहनधारकांना तब्बल एक किलोमीटर अंतराचा वळसा घालून जावे लागत आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच सुरक्षिततेच्या कारणावरून पोलीस प्रशासनाकडून पंचवटीत जागोजागी रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट टाकून रस्ते बंद केले जात असल्याने पोलीस प्रशासनाचा अतिरेक वाढत चालल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
पोलिसांनीच केला पंचवटीत रस्ता बंद
By admin | Updated: August 1, 2015 23:43 IST