शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:36 IST

नाशिक : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मागील महिन्यापासून विशेष मोहीम सुरू असून अवैध धंद्यावर सत्वर कारवाई करण्यासाठी उपविभागीय स्तर तसेच पोलीस ठाणे निहाय पथके तयार करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे धडक कारवाई सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे धडक कारवाई सुरू

नाशिक : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मागील महिन्यापासून विशेष मोहीम सुरू असून अवैध धंद्यावर सत्वर कारवाई करण्यासाठी उपविभागीय स्तर तसेच पोलीस ठाणे निहाय पथके तयार करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे धडक कारवाई सुरू आहे.जिल्ह्यातील अवैधरित्या मद्याची विक्री व वाहतूक करणारे, हातभट्टीची गावठी दारू तयार करणारे, अंक आकडे तसेच पत्त्यांवर पैसे लावून अवैधरित्या मटका व जुगार खेळणारे व खेळविणारे इसमांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉटेल-ढाबे, गावपताळीवरील अवैधरित्या चालणारे दारूचे अवैध धंदे चालणारे ठिकाणांची माहिती घेवून छापे टाकण्यात येत आहे. जिल्ह्यातील महार्गावर होणारी अवैध वाहतूक तसेच बेशिस्त वाहन चालकांवरही जिल्हा वाहतूक शाखा तसेच वाहतूक पोलिसांच्या मार्फतीने कारवाई चालू आहे.जिल्ह्यातील या विशेष मोहिमेत अवैध मद्यविक्री व वाहतूक करणारे तसेच हातभट्टीची गावठी दारू त यार करणाऱ्या एकूण ५६० इसमांवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली व त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाईत सुमारे ३१ लाख ३८ हजार ७०३ रुपयांचा अवैध मद्यसाठा, हातभट्टीची गावठी दारू व अन्य साहित्य जप्त करण्यात आली आहे.विशेषत: जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग घोटी, इगतपुरी, वाडिवºहे, त्र्यंबकेश्वर, कळवण, अभोणा, हरसुल, देवळा व मालेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेले गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये एकूण १०८ केसेस करण्यात आल्या असून सुमारे १५० जुगारी इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ३७ हजार ९०९ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपी फरार आहे, अशा ३३ आरोपींचा शोध घेवून अटक करण्यात आली आहे. तसेच महिनाभरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळणाºया ८ आरोपींविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करून ८ देशी बनावटीचे पिस्तुल व १ गावठी कट्टा, २२ जिवंत काडतुसे, ८ मॅगझिन हस्तगत करण्यात आले आहेत. येवू न त्यांया विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (१५ क्राइॅम,१,२,३,४,)बेशिस्त वाहनचालकांकडून १५ लाखाचा दंड वसूलजिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, शहर वाहतूक शाखा मालेगाव तसेच पोलीस ठाणेनिहाय वाहतूक पोलिसांनी सदर मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन विना हेल्मेट व सिटबेल्ट, मोबाईलवर बोलणारे चालक, नो पार्किंग झोन, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, अवैध वाहतूक तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणारे इसमांवर ७५५७ केसेस दाखल केल्या व त्यांच्याकडून १५ लाख २० हजार ८०० रु. चा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिस दलातर्फे करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २८४२ केसेस करण्यात येवून ६९ वाहने जप्त करण्यात आली असून २५ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच ३० वाहनांचे निलंबन प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.पोलीस निलंबितशुक्रवारी (दि. १४) सटाण्यात ठाण्यात दाखल मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींकडे पैशांची मागणी करून लाच स्वीकारणारे पोलीस नाईक केशव सुदाम सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात कसुरी अथवा शिस्तभंग केल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिीस अधीक्षक संजय दराडे यांनी सांगितले.