शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस सुस्त : मालेगावी कॅम्पातील सोमवार बाजारात धुडगूस

By admin | Updated: February 18, 2015 23:59 IST

तृतीय पंथीयांची दादागिरी; शेतकरी त्रस्त

मालेगाव : येथील कॅम्प भागात सोमवारी सायंकाळी भरणाऱ्या भाजी बाजारात तृतीय पंथीयांकडून होणाऱ्या दादागिरीला शेतकऱ्यांसह महिला त्रस्त झाल्या आहेत. सोमवारी (दि. १६) या बाजारात पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील कॅम्प परिसरातील मराठी शाळेच्या आवारात दर सोमवारी सायंकाळी आठवडे बाजार भरतो. या बाजारात महिला भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्री करण्यासाठी आणतात. या शेतकऱ्यांवर तृतीय पंथीय दादागिरी करत असून, त्यांच्याकडून पैसे किंवा मालाच्या माध्यमातून वसुली करतात. एखाद्या शेतकऱ्याने त्यांना विरोध केला असता त्याच्या मालाची नासधूस करत मारहाण करण्याचे प्रकार नियमित घडतात. गेल्या सोमवारी सायंकाळी एका शेतकऱ्याने त्यांना विरोध केला असता त्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली.पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण सुरू असतानाही पोलिसांनी वेळेत लक्ष न दिल्याने या मारहाणीत शेतकरी जखमी झाला. त्यावेळी महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन त्यांनी घराकडे जाण्यासाठी गर्दी केली. यावेळी पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता संरक्षक जाळ्या लावून बंद करण्यात आला. त्यामुळे बाहेर पडण्याच्या एकाच मार्गावर कोंडी झाली होती. त्यात भुरट्या चोरांनी चार ते पाच महिलांचे दागिने ओरबाडण्याची घटना घडली. यातील काही महिला दागिने चोरीला गेल्याने घरच्यांचा जाच सहन करावा लागेल या भीतीने जागेवर रडत बसल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.हा बाजार पोलीस ठाणे असलेल्या इमारतीच्या परिसरात भरत असतानाही दरवेळी शेतकऱ्यांचा माल, पैसे आदि वस्तूंसह महिलांचे दागिने, पर्स, मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. त्यांचा बंदोबस्त करण्यापेक्षा पोलीस संरक्षक जाळ्या लावून पोलीस ठाणे सुरक्षित करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)