शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गुन्हेच घडू नयेत यासाठी पोलिसांनी आपला प्रभाव निर्माण करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:33 IST

येवला : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ठळक मुद्देभुजबळ : येवला तालुका पोलीस ठाणे इमारतीचे लोकार्पण

येवला : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.येवला प्रशासकीय संकुलातील तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा शेतीव्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारीवर्गाकडून होत होती. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कारवाई केल्याने शेतकरी समाधानी झाले आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकास कामे थांबली होती. मात्र येवला मतदारसंघात विकासकामे अविरत सुरू राहिले हे विशेष आहे. पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर म्हणाले की, या वास्तूतून शोषित पीडित समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करतो.कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, समरसिंग साळवे, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता शरद राजभोर, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, राधाकिसन सोनवणे, अंबादास बनकर, अरुण थोरात, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मानले.अशी आहे पोलीस स्टेशन इमारतयेवला शहरात विखुरलेल्या स्वरूपात अडगळीच्या ठिकाणी व अपुऱ्या जागेत तालुका पोलीस स्टेशन कार्यान्वित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व प्रभावी प्रशासनासाठी या प्रशाकीय संकुलात तालुका पोलीस स्टेशन इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १ कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. या इमारतीचे सर्वसाधारण चटई क्षेत्रफळ-४२५० चौ.फूट इतके आहे. यामध्ये मुख्य पोलीस स्टेशन इमारतीमध्ये तपासणी अधिकारी कक्ष, महिला कॉन्स्टेबल कक्ष, एस. एच. ओ. कक्ष, सशस्त्र खोली, पुरुष व महिला लॉकअप, प्रसाधनगृह, तपासणी कक्ष, संगणक कक्ष , रेकॉर्ड रुम, दिव्यांगासाठीचा रॅम्प तसेच इतर सोयी-सुविधा असणार आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेGovernmentसरकार