आझादनगर : शहरातील इस्लामपुरा भागातील अप्सरा जनरल स्टोअर्स येथे शनिवारी दुपारी तीन वाजता विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे ८५ हजार रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दुकानमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगार बाजार येथील अप्सरा जनरल स्टोअर्स येथे छापा टाकला असता शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला असा ८४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी दुकान मालक खालीद हुसेन शाहीद हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाईसाठी मनपाचे अन्न सुरक्षा अधिकारी मंडलिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. कारवाई पथकात नंदकिशोर पाटील, नितेश खैरनार, नवनाथ सूर्यवंशी, प्रमोद सोनवणे यांचा समावेश होता.
पोलिसांच्या छाप्यात ८५ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:29 IST
आझादनगर : अप्सरा स्टोअर्स येथे विशेष पोलीस पथकाने छापा टाकून ८५ हजार रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला
पोलिसांच्या छाप्यात ८५ हजारांचा गुटखा जप्त
ठळक मुद्देदुकानमालकावर गुन्हा दाखल ८४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला