शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चौघे तस्कर फरार : पोलीस पाटलाच्या जागरुकतेमुळे ६४ किलो गांजा पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 22:11 IST

  नाशिक : शहर व परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वारंवार प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. माडसांगवीचे ...

ठळक मुद्देमळे भागात फेकली अंमली पदार्थाची बॅगआडगाव पोलिसांकडूनसंशयितांचा शोध सुरु

 

नाशिक : शहर व परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वारंवार प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. माडसांगवीचे पोलीस पाटील कृष्णा गरड यांनी शहरातून माडसांगवीकडे औरंगाबाद महामार्गावरुन प्रवास करताना दाखविलेल्या जागरुकतेमुळे पोलिसांच्या हाती ६४ किलो गांजा लागू शकला; मात्र गांजाची तस्करी करणारे चौघे दुचाकींवरुन फरार झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.माडसांगवी येथूननेहमीप्रमाणे गरड हे दुधविक्रीसाठी पंचवटी येथे आले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास माडसांगवी उड्डाणपुलालगतच्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला गरड यांना दोन दुचाकींवर चौघे अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या एक गोणी व हिरव्या रंगाची बॅग घेऊन उभे असल्याचे दिसले. गरड यांनी त्यांची मारुती कार बाजुला घेत त्यांना हटकले. यावेळी त्यांनी दुचाकी बाजूला करत गरड यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी गरड यांनी 'गोणी व बॅगेत काय आहे, ते खोलून दाखवा' असे सांगितले असता त्यांना दुचाकीला ह्यकिकह्ण मारत तेथून पळ काढला. एक संशयित मळे भागातील रस्त्याने येथील कारखान्याच्या पाठीमागील बाजूने दुचाकीने फरार झाला तर त्याचे अन्य तीघे साथीदार एकाच पल्सर दुचाकीने औरंगाबाद महामार्गाने शिलापूरकडे भरधाव निघून गेले. गांजाची तस्करी करणाऱ्यांनी पळ काढल्यामुळे गरड यांचा संशय अधिकच बळावला व त्यांनी तत्काळ आडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घडलेला प्रकार कथन करत मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख हे त्यांच्या पथकासह माडसांगवीच्या दिशेने रवाना झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.--इन्फो--मळ्यात मिळाली गांजाने भरलेली बॅगमाडसांगवी शिवरातील मळे परिसरात पोलिसांनी शोधमोहिम राबविली तसेच फरार संशयितांचे व त्यांच्या दुचाकींचे वर्णन गरड यांनी सांगितल्याप्रमाणे बिनतारी संदेश यंत्रणेवरुन तत्काळ सर्व गस्तीपथकांना कळविण्यात आले. ग्रामिण पोलीस दलालाही याची माहिती दिली गेली. गुन्हे शोध पथकांनी तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांना येथील मळे परिसरात एका हिरव्या रंगाची बॅग आढळून आली. बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे सहा लाख ४० हजार रुपये किंमतीचा ६४ किलो इतका गांजा आढळून आल्याचे शेख यांनी सांगितले.नाशिक : शहर व परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वारंवार प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. माडसांगवीचे पोलीस पाटील कृष्णा गरड यांनी शहरातून माडसांगवीकडे औरंगाबाद महामार्गावरुन प्रवास करताना दाखविलेल्या जागरुकतेमुळे पोलिसांच्या हाती ६४ किलो गांजा लागू शकला; मात्र गांजाची तस्करी करणारे चौघे दुचाकींवरुन फरार झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी