शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला पोलिसांकडून ५० वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:13 IST

कोरोनाचा प्रकोप झपाट्याने वाढत असतानाच कळवणकर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने त्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोणीही विनाकारण रस्त्यावर दिसले किंवा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

ठळक मुद्देविनाकारण घराबाहेर पडणार महागात : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर कारवाई होणार

कळवण : कोरोनाचा प्रकोप झपाट्याने वाढत असतानाच कळवणकर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने त्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोणीही विनाकारण रस्त्यावर दिसले किंवा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.संचारबंदीच्या कालावधीत घराबाहेर पडणाºया लोकांची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्याच्या कारवाईला शहरात सुरु वात झाली असून, ५० वाहने जप्त करण्यात आली आहेत. कळवण शहरातील सर्वच प्रमुख चौकात, रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहने अडविण्यात येत आहेत. सर्व वाहने जप्त करण्यात येत असून ती लॉकडाउननंतरच सोडण्याचा पोलिसांचा विचार आहे. कोरोना विषाणूची साखळी मोडून काढण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांची रस्त्यावर होणारी गर्दी पाहता खासगी वाहने रस्त्यावर आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर येत असून, बाजारपेठेतही गर्दी करीत आहेत. वारंवार सूचना देऊनही वाहनचालक ऐकत नसल्याने बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक सोनवणे, निकम यांच्यासह कर्मचाºयांनी शहरातील प्रमुख चौक, मार्गावर वाहनचालकांची कसून चौकशी सुरू केली. घराबाहेर फिरण्याचे कारण योग्य असेल तरच संबंधितांना सोडले जात होते. जे विनाकारण फिरत आहेत. त्यांची वाहने जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहेत. अन्यथा संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला आहे.संचारबंदीचा आदेश लागू असताना मॉर्निंग वॉकला जाण्याचे प्रमाण अद्याप कायम असून, त्यांना रोखण्यासाठी गुड मॉर्निंग पथक तैनात करण्यात येणार आहे. रस्त्यावर वॉकिंगसाठी आलेल्या नागरिकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस