शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

पेट्रोल बॉम्ब शोधणारा ‘स्निफर स्पाइक’ श्वानाला पोलिसांचा ‘सॅल्यूट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील ‘स्निफर स्पाइक’ हे श्वान पेट्रोल बॉम्ब शोधक म्हणून प्रसिद्ध होते. स्पाइक’चे ...

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील ‘स्निफर स्पाइक’ हे श्वान पेट्रोल बॉम्ब शोधक म्हणून प्रसिद्ध होते. स्पाइक’चे वयोमान आणि त्याने पूर्ण केलेली ११ वर्षांची प्रदीर्घ सेवा लक्षात घेता बीडीडीएस पथकाने या आपल्या प्रिय साथीदाराला सन्मानाने सेवानिवृत्त केले. सजविलेल्या पोलीस वाहनाच्या बोनेटवर बसवून लाडक्या स्पाइकला छोटेखानी मिरवत पोलिसांनी ‘सॅल्यूट’ केला. तसेच त्याच्या वाढदिवसानिमत्त केकदेखील कापण्यात आला.

नाशिक बॉम्बशोधक-नाशक पथकात २०१०साली तीन महिन्यांचे लॅब्रोडोर जातीचे हे प्रशिक्षित श्वान दाखल झाले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये स्पाइकचे वयोमान आणि सेवाकालावधी लक्षात घेता त्यास पोलीस सेवेतून मंगळवारी (दि.२३) सेवानिवृत्त करण्यात आले.

छुप्या घातक स्फोटकसदृश वस्तू शोधण्यात तरबेज असलेल्या ‘स्पाइक’ने २०१५-१६साली नाशकात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी सुरक्षिततेच्यादृष्टीने रामकुंड, तपोवन, साधुग्राम या भागात पोलीस कर्मचाऱ्यांसह अहोरात्र सेवा बजावली. तत्पूर्वी २०१३-१४साली राजीव गांधी भवनसमोरील एका व्यापारी संकुलात एका अज्ञाताने ठेवलेला पेट्रोल बॉम्ब याच स्पाइकने शोधून काढला होता. तेव्हा तो अवघ्या तीन ते चार वर्षांचा होता. तसेच शहरातील रेल्वेस्थानक असो किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असो, अशा प्रत्येकवेळी ते ठिकाण पूर्णपणे ‘स्पाइक’ पिंजून काढत होता. काळाराम मंदिराच्या परिसरात नेहमीच या श्वानाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह हजेरी लावून परिसराची चाचपणी केली आहे. लॅब्रोडर स्पाइकला पुढील कायमस्वरूपी संगोपनाकरिता मागील दहा वर्षांपासून त्याचा संभाळ करणारे श्वान हस्तक पोलीस गणेश हिरे यांना सोपविण्यात येणार आहे. अत्यंत शांत स्वभावाचे हे श्वान इतर लॅब्रोडोर जातीच्या श्वानाप्रमाणे नाजूक नसून अत्यंत कठोर परिश्रम घेणारे कष्टाळू श्वान असल्याचे बीडीडीएसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सांगितले.

---इन्फो--

राष्ट्रपती दौरा ते मोदींच्या सभेत भूमिका

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नाशिक दौरा असो किंवा त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनात झालेली जाहीरसभा असो अशा या दोन्ही महत्त्वांच्या कार्यक्रमाप्रसंगी सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘स्पाइक’ श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

---इन्फो--

...अन‌् रेल्वेच्या सुरक्षेसाठी ‘स्पाइक’ची धाव

दीड वर्षांपूर्वी एका रेल्वेत बॉम्बसदृश वस्तू असल्याचा ‘कॉल’ पथकाला मिळाला होता. यावेळी इगतपुरी रेल्वेस्थानकावर संशयित एक्स्प्रेस रेल्वे गाडी थांबवून रेल्वेचा कानाकोपरा बॉम्ब शोधक नाशक पथकाने या श्वानाच्या साहाय्याने पिंजून काढला होता. सुदैवाने रेल्वेत कोठेही स्फोटकसदृश वस्तू आढळून आली नव्हती.

---

फोटो आर वर २३डॉग१/२/३