शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

परप्रांतीयांसाठी पोलीस करतो रिक्षांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:36 IST

नाशिक :(धनंजय रिसोडकर ) कुणी हजार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रेल्वेने चालले तर कुणी पायी चालले, कुणी सायकलवरून कुणी ट्रकमधून तर कुणी रिक्षामधून. कसाराघाटातून नित्यनेमाने जात असलेल्या अशा शेकडो रिक्षांपैकी बंद पडणाऱ्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हात देत त्यांना पुढे मार्गस्थ करण्याचे काम कसाराघाटात सेवारत असलेले पोलीस कर्मचारी सतीश चव्हाण हे करीत आहेत.

नाशिक :(धनंजय रिसोडकर ) कुणी हजार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी रेल्वेने चालले तर कुणी पायी चालले, कुणी सायकलवरून कुणी ट्रकमधून तर कुणी रिक्षामधून. कसाराघाटातून नित्यनेमाने जात असलेल्या अशा शेकडो रिक्षांपैकी बंद पडणाऱ्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हात देत त्यांना पुढे मार्गस्थ करण्याचे काम कसाराघाटात सेवारत असलेले पोलीस कर्मचारी सतीश चव्हाण हे करीत आहेत. त्यामुळे पोलीस म्हणून सेवा बजावतानाच हे कर्मचारी त्यांच्या रिक्षा दुुरुस्तीच्या कौशल्याचा वापरदेखील या गोरगरीब परप्रांतीयांना करून देत माणुसकीचा झरा कायम असल्याचा प्रत्यय देत आहेत.हजारो परप्रांतीय ठाण्यातून बाहेर पडत पुढील वाहन मिळेपर्यंत रिक्षाने पुढे जाण्याचा पर्याय स्वीकारत आहेत, तर काही परप्रांतीय आपापल्या मालकीच्या रिक्षांमधून गावांकडे मार्गस्थ होत आहेत. मात्र, कसाºयाच्या घाटातील चढावावर अनेक रिक्षांमध्ये काही ना काही बिघाड होण्याचे प्रकार घडतात. अशावेळी त्या रिक्षाचालकास दुरुस्तीची फारशी माहिती नसल्यास त्या रिक्षाचालकाबरोबरच त्यात बसलेल्या कुटुंबीयांची ओढाताण सुरू होते. रिक्षात बसलेल्या महिलांसह बालकांना रिक्षातून खाली उतरून पायी मार्गक्रमण करणे तर रिक्षाचालक आणि त्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला रिक्षाला ढकलत मेकॅनिक मिळेपर्यंत रिक्षा ढकलणे क्रमप्राप्त बनते. अशावेळी जर एखादा पोलीस त्या रिक्षाचालकाला रिक्षाची दुरुस्तीकरिता मदत करण्यासाठी पुढे सरसावला तर तो त्या कुटुंबीयांसाठी अक्षरश: देवदूतच ठरतो. नाशिक ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले सतीश चव्हाण हे पोलीस कर्मचारी सध्या कसारा घाटाच्या हद्दीत सेवेवर आहेत. ते पोलीसमध्ये भरती होण्यापूर्वी रिक्षा चालवायचे. तसेच अडीअडचणीच्या वेळी गरज पडल्यास तिची दुरुस्तीदेखील करायचे. त्यामुळे रिक्षाची पूर्ण दुरुस्ती करणे त्यांना अवगत आहे. अनेक रिक्षांना कसाराघाटात काही समस्या निर्माण झाल्यास त्या रिक्षांच्या दुरुस्तीत मदतीचा हात पुढे करीत हा कर्मचारी त्यांना पुढील मार्गक्रमणात सहायक ठरत असल्याने त्यांच्या रूपाने देवदूतच भेटल्याची भावना अनेक रिक्षाचालक आणि कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

-------------------------------------------

मी यापूर्वी रिक्षाचालक असल्यामुळे मला रिक्षा दुरुस्तीचीही बरीच माहिती आहे. त्या अनुभवाचा फायदा बंद पडलेल्या रिक्षाचालक आणि परप्रांतीयांना करून देत आहे. त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद खूप समाधान मिळवून देतात.- सतीश चव्हाण,पोलीस कर्मचारी

 

 

टॅग्स :Nashikनाशिक