नाशिक : नाशिक जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना आणि नाशिक-गोदा आळंदी खोरे विकास कृती समिती नाशिक यांच्यातर्फे ग्रामीण, तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन येथील हुतात्मा स्मारक येथे करण्यात आले होते.यावेळी आर्किटेक्ट अमृता पवार यांनी हुतात्मा स्मारक येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिराअंतर्गत पोलीस निरीक्षक एन. एस. तडवी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस दलातील शासकीय कामकाज, नियम, निकष तसेच शासनाचे आदेश याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस भरतीसाठी सहभागी होण्यासाठी पोलिसांनी कुठल्या प्रकारच्या कागदपत्रांचे सादरीकरण करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले. अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार तसेच क्रीडा प्रशिक्षक नंदू उगले यांनी पोलीस भरतीप्रकियेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध मैदानी स्पर्धांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, प्रा. सोमनाथ मुठाळ, सुरेश भोर यांनी मनोगत व्यक्त करताना सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर ठोमरे, तर आभार प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी केले. यावेळी भालचंद्र राजपुत, सुरेश रोडे, मनोज कांबळे, संकेत नेवकर, अशोक राबडे, अमोल पवार, मंगेश साबळे, विलास मगरे यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर
By admin | Updated: March 30, 2016 23:33 IST