नाशिक : पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसºया महिलेसोबत प्रेमविवाह करून त्या पत्नीला जातीयवाचक शिवीगाळ व मारहाण करत वारंवार शारिरिक-मानसिक छळ करत आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका पोलिस शिपायाविरूध्द सरकारवाडा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित कुंदन सुर्यभान भाबड (३२, रा. स्नेहबंधन पार्क, शरणपूररोड) यास अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुंदन याचे पुर्वी लग्न झालेले असताना त्याने रोहिणीनावाच्या एका महिलेशी प्रेमविवाह केला. त्यानंतर तिला सातत्याने शिवीगाळ करत शारिरिक-मानसिक त्रास देत जातीवाचक शिवीगाळ करत आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचे कुंदन सुनील आढाव (२५,रा. जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रोहिणी कुंदन भाबड या महिलेने रविवारी (दि.२७) गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई कुंदन भाबड याने रोहिनी हिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. कुंदन भाबड याचे अगोदर लग्न झालेले असतानाही त्याची माहिती त्याने रोहिणीला दिली नाही. तसेच रोहिनीसोबत ‘कोर्ट मॅरेज’ केले. लग्नानंतर तु तुझी जात का लपवली अशी कुरापत काढून भाबडने रोहिणीचा छळ सुरु केला व तिला मारहाणही केली. यामुळे रोहिणीने स्नेहबंधन पार्कमधील राहत्या घरी गळफास घेतला. रविारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी भाबडच्या छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून झाल्याने सरकारवाडा पोलिसांनी भाबडविरूध्द आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तसेच त्याच्याविरूध्द अॅक्ट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हादेखील दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.
आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 19:13 IST
रविारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी भाबडच्या छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप
आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस पतीला अटक
ठळक मुद्देरोहिनीसोबत ‘कोर्ट मॅरेज’ केले. भाबडविरूध्द आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा