शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोदापार्कवर पोलिसांचा खडा पहारा

By admin | Updated: May 7, 2017 01:28 IST

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक काळे यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे अ‍ॅथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी सुयोजित व्हॅरिडियन गार्डन धोकादायक बनले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गोदावरीचा किनारा, गोदापार्कवर विकसित करण्यात आलेले उद्यान हे प्रेमलीला तसेच स्टंटबाजी करणाऱ्यांचे हक्काचे ठिकाण बनले आहे़ अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे आरोग्याच्या रक्षणासाठी सकाळ-सायंकाळ फेरफटका मारणारे, मोकळी हवा अनुभवण्यासाठी येणारे, अ‍ॅथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी सुयोजित व्हॅरिडियन गार्डन धोकादायक बनले आहे़ दरम्यान, या घटनेनंतर शनिवारी नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला़ या ठिकाणची टवाळखोरी व हुल्लडबाजी रोखण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़गोदापार्कवरील निवांतपणा, मोकळी हवा व शांततेमुळे येणारी कुटुंबवत्सल मंडळी याकडे फिरकेनाशी झाली आहे़ दुचाकी वाहनांवरील स्टंटबाजी तसेच चारचाकी वाहनांवर भयानक वेग, अश्लील चाळे करणाऱ्यांमुळे आलेले विदारक स्वरूप यासाठी कारणीभूत आहे़ अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे हे शुक्रवारी सकाळी गोदापार्कमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत होते. त्यावेळी मद्यधुंद नयूश कैलास कडलग (२०, रा़ कडलग मळा, नवश्या गणपतीशेजारी, गंगापूर रोड, आनंदवली) व समीर विश्वनाथ कांबळे (२१, रा़ म्हसरूळ) या दोघांनी मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत जाब विचारायला गेलेल्या वैजनाथ काळे यांच्यावर या दोघांनी थेट चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले़