शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची नाकाबंदी तरीही घडते सोनसाखळी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:21 IST

सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडवर एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.

नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडवर एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मखमालाबादरोडवर आणि काठेगल्लीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यानी हिसकावून नेली होती. तसेच तत्पूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू केला जात नाही तोच आता पुन्हा मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पखालरोडवर श्री अय्यपा मंदिराजवळ अर्चना अतुल अन्नदाते (४५, रा.गुरू अय्यपन अपार्टमेंट, खोडेनगर) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सुमारे २५ ग्रॅमची सोनसाखळीतील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने आलेला चोरटा फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली तेथून पुढे अशोका पोलीस चौकीकडे सिग्नलवर बॅरिकेड टाकून रस्ता आठ वाजताच बंद केला जातो तरीदेखील सोनसाखळी हिसकावून नेणारा चोरटा निसटून जाण्यास यशस्वी ठरला. अन्नदाते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.  रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी बॅरिकेड टाकून रस्ते बंद केले जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरी