नाशिक : पर्वणीसाठी नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी पोलीस दंडेलशाही करीत असल्याचे दृष्य महामार्ग बसस्थानाकाच्या परिसरात दिसून आले. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना रामकुंडाकडे जाण्याचामार्ग न सांगता या बाजूने जाऊ नका, इकडे वळू नका, असे पोलीस सांगताना दिसून आले. भाविकांना लांबचा रस्ता घेऊन जावे लागले. महिला, मुले, आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागला.
पोलिसांची दंडेलशाही
By admin | Updated: August 29, 2015 23:34 IST