शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:16 IST

शहरातील उड्डाणपुलाखाली, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यांवर भिकाºयांची संख्या गत काही दिवसांत चांगलीच वाढली होती़ एकाच ठिकाणी राहून तिथेच सर्व विधी उरकून शहराच्या अस्वच्छतेत भर घालणाºया तसेच वाहनधारक व नागरिकांकडून भीक मागणारे, पैसे न दिल्यास गाडीस नुकसान पोहोचविणाºयांविरोधात कारवाई करण्याची विनंती महिला व बालकल्याण विभागाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे केली होती़

नाशिक : शहरातील उड्डाणपुलाखाली, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यांवर भिकाºयांची संख्या गत काही दिवसांत चांगलीच वाढली होती़ एकाच ठिकाणी राहून तिथेच सर्व विधी उरकून शहराच्या अस्वच्छतेत भर घालणाºया तसेच वाहनधारक व नागरिकांकडून भीक मागणारे, पैसे न दिल्यास गाडीस नुकसान पोहोचविणाºयांविरोधात कारवाई करण्याची विनंती महिला व बालकल्याण विभागाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे केली होती़ न्यायाधीश शिंदे यांनी शहर पोलीस आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि़ ७) शहरात भिक्षेकरीमुक्त अभियान राबविण्यात आले़  संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीतून १६४ भिक्षेकºयांना पकडून पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदनगर, पुणे, नाशिक व मनमाड याठिकाणच्या पुनर्वसन केंद्रात रवाना केले़ शहर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी भिक्षा प्रतिबंधक अधिनियम १९५९ अन्वये शहरातील विविध सिग्नल्स, उड्डाणपूल, रस्ते या ठिकाणी सोमवारी विशेष मोहीम राबविली़ या विशेष मोहिमेसाठी दोन पोलीस अधिकारी व दहा कर्मचारी असलेल्या प्रत्येकी सहा टीम व बारा वाहने देण्यात आली होती़ पोलिसांनी शहरातील १६४ भिक्षेकºयांना पकडून पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये आणले़ पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी या भिक्षेकºयांची अंघोळ, केशकर्तन, नवीन कपडे व जेवणाची व्यवस्था केली होती़  भिक्षेकऱ्यांची मुलाची स्वच्छता तसेच नवीन कपडे घातल्यानंतर तर ती भिक्षेकºयांची मुलेच नसल्याचे चित्र दिसत होते़ यानंतर या सर्व भिकाºयांना जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यवान डोके यांच्यासमोर हजर करण्यात  आले़  पोलिसांनी पकडलेल्या या भिकाºयांची पुरुष, महिला, मुले, मुली अशी विभागणी करून पुनर्वसनासाठी पुरुषांना अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील गव्हर्नमेंट मेल रिसिंग सेंटर, महिलांना पुणे येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र तर मुले व मुलींना अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह मनमाड व मालेगाव या ठिकाणी पाठविण्यात आले़भिक्षेकयांच्या अजब-गजब गोष्टी़कॉलेजरोड परिसरात एक वृद्ध भिकारी होता़ नागरिकांनी दिलेले सुटे पैसे तो सायंकाळी याच परिसरातील स्वीट्स मालकाकडे ठेवण्यासाठी देत असे़ या स्वीट्स दुकानाचा मालकही या भिकाºयाचे पैसे एका बाजूला ठेवून देत असे़ काही वर्षांनी या भिकाºयाचे निधन झाल्यानंतर स्वीट्स मालकाने रक्कम मोजली असता त्यालाही आश्चर्य वाटले़ या भिकाºयाचे तब्बल नऊ लाख रुपयांचे सुटे पैसे जमा झाले होते़ या स्वीट्स दुकानाच्या मालकाने या भिकाºयाची संपूर्ण रक्कम ही स्वयंसेवी संस्थांना दान केली़टिळकवाडी सिग्नलवर नाशिककरांना एक हात व पाय अर्धवट असलेला एक भिकारी उन्हा-तान्हात नेहमी भीक मागताना दिसतो़ त्याच्या शरीराकडे पाहून नागरिकांना दया येते व पैसेही देतात़ मात्र, या भिक्षेकºयाची अजब तºहा ऐकून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही़ या भिक्षेकºयाने आपले व्यसन अर्थात विडी पिण्यासाठी चक्क दोनशे रुपये रोजाने एका महिलेचे नेमणूक केली आहे़ विडी पेटवून देण्यासाठी या महिलेला हे पैसे दिले जातात़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय