येवला : नाशिकमधील पंचवटी भागात घरफोडी करून दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला दोन संशयित वेगवेगळ्या दुचाकीवर येवल्याच्या दिशेने जात असताना दिसल्या. दोन्ही दुचाकींच्या मागील व पुढील नंबरप्लेट या वाकवलेल्या असल्याने पथकाला संशय आला. या दोघा दुचाकीस्वारांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेग वाढवून पळ काढला. पोलीस पथकाने पाठलाग केला, मात्र संशयित चकवा देत नेवरगाव (ता. येवला) शिवारातील शेताजवळ चोरीच्या दुचाकी टाकून देत शेजारील उसाच्या शेतात लपले. पोलीस पथकाने पावलांच्या ठशावरून संशयितांचा माग काढत गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घातला व संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. ग्रामीण पोलिसांनी निरीक्षक बर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल यांच्या विशेष पथकाच्या सतर्कतेमुळे पंचवटीतील घरफोडीत चोरी गेलेल्या दुचाकीसह संशयित चोरटे ताब्यात आले असून गुन्हा उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
चोरीच्या दुचाकीसह संशयित पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 16:55 IST
येवला : नाशिकमधील पंचवटी भागात घरफोडी करून दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.
चोरीच्या दुचाकीसह संशयित पोलिसांच्या ताब्यात
ठळक मुद्देदुचाकी टाकून देत शेजारील उसाच्या शेतात लपले.