शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड शार्पशूटर ज्या ‘पार्वती’च्या फ्लॅट क्रमांक तेरामध्ये आश्रयाला होते त्या घरमालकावर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 14:35 IST

घर मालकांनी भाडेतत्वाचा करार भाडेकरूंशी करताना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या कराराची माहिती द्यावी व आवश्यक कागदपत्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्तता करून पोलिसांकडून पडताळणी करुन घेत नाहरकरत दाखला प्राप्त करावा, असा आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काढला होता. मात्र अद्यापही याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते.

ठळक मुद्देशहरात मोठा कांड घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी आश्रय घेतल्याचा पोलिसांनी संशय १३ क्रमांकाची सदनिका सावंत यांच्या मालकीची

इंदिरानगर : अहमदनगरच्या कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व घातक शार्प शूटर अशा तीघा गुन्हेगारांना कोणतीही चौकशी न करता स्व मालकिच्या सदनिकेत भाडेतत्वाचा करार करून आश्रय दिला; मात्र याबबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यापासून दडविल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पार्वती अपार्टमेंटमधील रहिवासी घरमालक रमेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सदनिके तून पोलिसांनी रविवारी पहाटे कुख्यात गुंडांच्या मुसक्या शिताफिने आवळल्या. शहरात मोठा कांड घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी आश्रय घेतल्याचा पोलिसांनी संशय आहे.दहशतवादविरोधी पथकाने काही वर्षांपूर्वी सातपूर परिसरात दहशतवादी बिलालला अटक केली होती. त्यानंतर घर मालकांनी भाडेतत्वाचा करार भाडेकरूंशी करताना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या कराराची माहिती द्यावी व आवश्यक कागदपत्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्तता करून पोलिसांकडून पडताळणी करुन घेत नाहरकरत दाखला प्राप्त करावा, असा आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काढला होता. मात्र अद्यापही याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते.पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवनाच्या पाठीमागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तीसर्‍या मजल्यावरील १३ क्रमांकाची सदनिका सावंत यांच्या मालकीची आहे. हा परिसर तसा नव्याने विकसीत होत असल्यामुळेया भागात वर्दळीही कमी असते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून अहमदनगरच्या मोक्यातील सराईत गुन्हेगार शाहरूख शेख, सागर पगारे, बारकू अंभिरे यांया मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल, चाळीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शहरात मोठे कांड करण्याचा कट या तिघांनी रचला होता; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आणि या कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मात्र याबाबत जर घरमालकाने संबंधितांची माहिती पोलिसांना याअगोदरच दिली असती तर कदाचित इतक्या कालावधीपर्यंत त्यांना वास्तव्य करता आले नसते. सावंत यांनी माहिती दडविल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.