शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत टाकले विषारी औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 14:54 IST

ब्राम्हणगाव : जुनी शेमळी ता . सटाणा येथील एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील विहिरीसह गोठफॉर्म जवळील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी दूषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी,महसूल व पोलीस प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने बच्छाव कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.

ब्राम्हणगाव : जुनी शेमळी ता . सटाणा येथील एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील विहिरीसह गोठफॉर्म जवळील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी दूषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी,महसूल व पोलीस प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने बच्छाव कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. जुनी शेमळी येथील एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील घरालगत असलेल्या विहिरीत गोठाफॉर्मच्या जवळील पाण्याच्या टाकीत व विहिरीत विषारी औषध टाकून पाणी दूषित केले. सदरची ही बाब मंगळवारी लक्षात आल्यावर बच्छाव यांनी विहिरीतील दुषित पाणी सटाणा लॅबमध्ये तपासणीसाठी आणले असता सदरचे पाणी नमुना तपासणी पुणे येथे होऊ शकत असल्याने रवाना करण्यात आले.सदरची घटना गावांत समजली असता सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,व परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी कृषी अधिकारी, महसूल विभागाचे तलाठी यांना ही बाब लक्षात आणून देत त्यांनी आपले हात वर करीत आपण काहीही करू शकत नसल्याचे उडवाउडवीची उत्तरे दिली. सटाणा पोलिसांकडेतक्र ार दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी दोन दिवस उलटूनही पंचनामा करण्यासाठी न आल्याने बच्छाव कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. बच्छाव यांच्या शेतीविहीरितून शेती पिकबरोबरच जनावरांचे पिण्याचे पाणी दिले जात होते. घरालगत असलेल्या गोठफॉर्म मध्ये तीस शेळी,तीस बोकड व पाठ, दोन गायी,दोन म्हैस, एक बैलजोडी यांनी हे विषारी पाणी प्यायले असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. मात्र वेळीच विहिरीत पाण्याचा रंग बदलांमुळे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ शेती व जनावरांचा चारा,पाण्यासाठी वापर केला नाही. या घटनेची पोलिसांत तक्र ार दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी बच्छाव कुटूंबियांसह ग्रामस्थ, व शेतकºयांनी केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक